नेमाडे सरांची हिंदू जगण्याची समृध्द अडगळ वाचायला घेतली आहे. माझ्याच विभागाने चालवलेल्या पुरातत्वाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात मीच या वर्षी दाखल झाले असल्याने वाचायला आणखी मजा येते आहे. खंडेराव- चुकलं- नेमाडे सर स्वतः डेक्कन कॉलेजमधून एम् ए करत होते असं जामखेडकर सरांनी संगितलं.
मग विषय हिंदूवरून डेक्कन कॉलेजच्या जुन्या दिवसांवर सरकला. नेमाडे सरांनी इंग्रजीतून एम्ए केलेलं माहीत होतं. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी लिंग्विस्टिक्समध्ये एम्ए करायला घेतलेलं... जामखेडकर सरांनीही.- आणि मग त्यांच्या सरांनी त्यांची कत्तल केली. सर्वांनाच कमी मार्क्स दिले. हाइयेस्ट मार्क्स म्हणजे दोनशेपैकी सत्तर. पासापुरते. म्हणजे वर्गातला एकच विद्यार्थी पास. बाकी कत्ले आम. सर सांगत राहिले- हे त्यांचे शिक्षक फ्रान्सहून डॉक्टरेट करून आले होते. एका बहुत बड्या फ्रेंच लिंग्विस्टचे विद्यार्थी म्हणून त्यांचा दबदबा होता. तो दबदबाच तेवढा. शिकवण्याच्या नावाने शून्य. ते वर्गात काहीच धड शिकवायचे नाहीत. विद्यार्थी म्हणजे कःपदार्थ. त्यांनी तयार केलेला सिलॅबसही गोंधळाचाच होता. छळ. जामखेडकर सर, नेमाडे सर आता सत्तरी ओलांडलेले. त्यांचा एम्ए चा काळ म्हणजे ते विशीतले असतील. पन्नास वर्षे उलटून गेली. पण...
अजूनही कित्येक विद्वत्तेचा दबदबा असलेले शिक्षक मुलांवर सूड काढल्यासारखे शिकवतातच. आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची कोणतीही पद्धत, त्यांच्याबद्दलचे विद्यार्थ्यांचे मत लक्षात घेऊन त्याला बदलायला भाग पाडण्याचा कोणताही मार्ग अजूनही निघालेला नाही.
असे शिक्षक ज्यांच्या वाटेला येतात ते विद्यार्थी गप्प रहातील, त्यांचे सहशिक्षक नुसते पहात रहातील तोवर हे बदलणारही नाही.
मी औरंगाबादच्या स.भू. महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. तेथे नेमाडे सर सुद्धा विद्यार्थी-घाणे
ReplyDeleteप्राध्यापक म्हणून ओळखले जायचे !!
याला म्हणतात गादी चालवणे...
ReplyDelete