हास्यास्पद म्हणावे की करुणास्पद असा प्रश्न आहे.
आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर घराणेशाहीची झूल चढवण्यासाठी सच अ लॉन्ग जर्नी या पुस्तकाच्या विथड्रॉवलच्या खेळीचा उपयोग करून घेण्यात आला. दसऱ्याला युवराज्याभिषेक पार पडल्याने सेना परिवाराचे घोडे गंगेत न्हाले आहे. त्यांना त्यात तसा फारसा रस राहिला असण्याचे कारण नाही. पण बुध्दीजीवींच्या क्षेत्रात ढवळाढवळ केल्यानंतर थोडे कवित्व करावे लागणारच. त्यामुळे काही चॅनेल्सवर डबेवाल्या काकांची मुलाखत वगैरे वाजवण्यात आली. सामनानेही लिहिले की कसा यात डबेवाल्यांच्या अस्मितेवर वार करण्यात आला... वगैरे. (या कादंबरीतील एक मॅड बावा पात्र आपल्या ट्रेनच्या प्रवासातला एका डबेवाल्याच्या घामात भिजण्याचा अनुभव सांगते हा त्याचा संदर्भ.) या कादंबरीवर एकंदर अपात्र लोकांनी भरपूर चर्चा केली. असल्याच लोकांनी याचा इश्यू करून विद्यापीठात तोडफोड केली असती, मालमत्तेचे नुकसान केले असते या भीतीनेच केवळ कादंबरी मागे घेतली असेल तर ते बऱ्याच अंशी समजून घेण्यासारखे आहे. आम्हाला एकेक वस्तू मिळवण्यासाठी इतका त्रास पडतो, मान्यता आहे, टेंडर आहे, कोटेशन आहे, पर्चेस कमिटी आहे, टेबलाटेबलांवर अडून रहाणे आहे,चेक काढण्यासाठी विनवण्या आहेत... त्या वस्तू कोणी माथेफिरूंनी फोडूनबिडून टाकल्या तर आम्हाला चांगलेच वाईट वाटले असते.
रोहिंटन मिस्त्रींना काय त्याचे? कॅनडात बसून...
त्यामुळे विद्यापीठाची स्वायत्तता- ऍट व्हॉट कॉस्ट असा प्रश्न आम्हा कुणाला पडला तर समजून घ्यावे अशीच परिस्थिती आहे. अखेर हे पुस्तक सिलॅबसमध्ये काढल्यामुळे खूप विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी, मित्रांनी वाचले हा एक साईड इफेक्ट किती महत्त्वाचा आहे पहा. (मी आणि माझ्या चार मित्रमैत्रिणींनी हे पुस्तक कधीही वाचायची सुतराम शक्यता नव्हती. ते काढून टाकण्याची मागणी होताच आम्ही सर्वांनी ते मिळवून वाचले, बा(ळा) उगवत्या सूर्या, लक्षात घे.)
यात शिव्या आहेत म्हणून ते विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणार नाही असे बाकी कोणीही सांगितले तर एक वेळ- जाऊ दे, जुनी बाळबोध माणसं आहेत- असं म्हणून ऐकून घेतलं असतं. बाळासाहेबांच्या पुत्रपौत्रांनी, सैनिकांनी हे म्हटले म्हणून प्रश्न पडला- हे हास्यास्पद म्हणावे की करूणास्पद?
आता या पुस्तकाच्या शिळ्या कढीला ऊत आणून आमच्या विद्यापीठात आणि विद्यापीठ परिघावर बुध्दीवादी राजकारणाचा वास परमाळतो आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दोनदा अरूण टिकेकरांनी, मिररमध्ये एकदा शांता गोखले यांनी लिहिल्यानंतर बऱ्याच लोकांना या इश्यूत आपली साधने परजून घ्यायची संधी दिसली आहे. तर विद्या'पिटा'तील काही संत(!) प्रवृत्तीच्या लोकांना आपसातले काही हिशेब चुकते करता येतील कां या संदर्भातील संधी दिसू लागल्या आहेत.
विद्यापीठात इंग्लिश विभागात असलेल्या प्रा.डॉ. निलूफर भरूचा या बोर्ड ऑफ स्टडीजवर होत्या त्या काळात त्यांच्या सूचनेवरून हे पुस्तक अभ्यासाला लावले होते आणि त्या भीतीने आता लपून बसल्या आहेत आणि परदेशी पळून गेल्या आहेत अशी बातमी आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये लागली आहे. ही बातमी विद्यापीठीय राजकारणाच्या गटारगंगेतल्याच कुणीतरी पेरली आहे हे निःसंशय.
प्रा. डॉ. निलूफर भरूचा या आंतरराष्ट्रीय इंग्रजी साहित्यक्षेत्रात नामवंत विदुषी म्हणून प्रसिध्द आहेत. इथल्या अनेकांना हे कदाचित् माहीत नसेल, परंतु त्या नोबेल पारितोषिक समितीवरही होत्या, कॉमनवेल्थ पुरस्कार समितीवरही होत्या आणि आहेत. जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका या देशांतील विविध विद्यापीठांकडून त्यांना सातत्याने निमंत्रणे येत असतात. आपल्याला एखादे आमंत्रण मिळवायचे तर कितीतरी क्लृप्त्या कराव्या लागतात याची जाणीव असलेल्या, स्वतःच्या थिटेपणाची जाणीव असलेल्या त्यांच्याच क्षेत्रातील एखाद्या लिलिपुटला त्यांच्या उंचीचा मत्सर असणे स्वाभाविक आहे. लोकशाही तत्वांमुळे कमी क्षमता असूनही ज्यांना पदे मिळाली, संधी मिळाली असे अनेक लिलिपुट्स् संधीचा लाभ घेऊन खरोखरीच वाढण्यापेक्षा इतरांची उंची त्यांचे पाय कापून काढून कशी कमी करता येईल याचाच विचार करीत असतात हे काय आम्हाला माहीत नाही...
निलूफर भरूचा हे सारे नाटक घडत असताना कॅम्पसवर होत्या, रोज संध्याकाळी चालण्याचा व्यायाम घ्यायला जात होत्या ते काय त्या घाबरल्या होत्या म्हणून की काय... त्या जर्मनीला गेल्या आहेत ही बातमी छापवून आणण्यामागे कुहेतूच आहे. विद्यापीठात एक नियम(अनेक कायदे आणि नियम गाढव असतात तसाच) आहे- कुलगुरूंची परवानगी न घेता विद्यापीठातील कुणी अगदी हनीमूनला सुध्दा परदेशी जाऊ शकत नाही. याच नियमाचा गैरआग्रह धरून नकळत किंवा वैयक्तिक कामामुळे परदेशी गेलेल्या लोकांनाही त्रास देण्याचे कार्यक्रम विद्यापीठाच्या भूतकाळात अनेकदा पार पडले आहेत.
भरुचाबाई या कादंबरीच्या संदर्भात कुलगुरूंना काही गोष्टी स्पष्ट सांगून आल्याचे त्यांनीच स्वतः मला सांगितले होते. ही गोष्ट आणखी ज्यांना माहीत झाली अशाच कोणीतरी ही बातमी छापवून आणण्याचा उद्योग केला हे स्पष्ट आहे.
अर्थात्, डॉ. भरुचा यांनी माझ्या मते एक मोठी चूक केली आहे ती म्हणजे, या विषयासंबंधात त्यांनी आपली भूमिका सडेतोडपणे, जाहीरपणे मांडली नाही. आपल्याला काय करायचे आहे- या विद्यापीठासाठी आता काहीही करण्याची माझी इच्छा उरली नाही, बाकी कोणी बोलत नसताना मीच काय म्हणून बोलू वगैरे कारणांनी त्यांनी जाहीर भूमिका घेतली नाही. विद्यावंतांच्या निष्क्रीय सौजन्याचेच हे उदाहरण ठरते. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विदुषी म्हणून त्यांनी आपली भूमिका ठणकावून मांडणे महत्त्वाचे ठरले असते. जे टिकेकरांनी, शांता गोखल्यांनी लिहिले ते त्यांनी लिहिले असते, मांडले असते, तर या विद्यापीठाच्या स्वतंत्र अस्मितेची शान वाढली असती. अजूनही वेळ गेलेली नाही, आपल्या कोषातून बाहेर पडून डॉ. भरूचांच्या क्षमतेच्या विद्यापीठातील विद्वानांनी आपली निष्ठा केवळ नोकरीशी नसून, उच्चपदस्थांशी नसून विद्येशी आणि निगडीत मूल्यांशी आहे हे दाखवून दिले पाहिजे.
या विषयाची चर्चा बातमी छापून येण्या अगोदर, विद्याक्षेत्रातील राजकारणाचे आणखी एक आगर म्हणजे एशियाटिक लायब्ररी येथे आधीच सुरू झाली होती असे माझ्या निदर्शनास आले आहे. ती चर्चा झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी बातमी छापून आली हेही पुरेसे बोलके आहे. कसले हे विद्याक्षेत्र- जेथे राजकारणक्षेत्रापेक्षा घाणेरडे आणि नीच राजकारण खेळले जाते.
तापल्या तव्यावर आपल्याही असूयेची पोळी भाजून घ्यायचा हा घाणेरडा प्रकार आहे.
दुसरी गोष्ट लिहायची आहे ती या सर्व विषयाबद्दल लिहिणाऱ्या अरूण टिकेकरांबद्दल. लोकसत्ताच्या संपादकपदी असताना सर्वकाळ बाळासाहेब ठाकऱ्यांवर टीका करण्याच्या भानगडीत पडणे टाळणाऱ्या टिकेकरांनी एकदम जोरदार पवित्रा घ्यावा हे निश्चितच गौरवास्पद आहे. विद्यापीठाचे इतिहासकार म्हणून त्यांनी या घटनेसंबंधी मत नोंदले हे महत्त्वाचे ठरते यात वादच नाही. पण सेनेपासून आपली चामडी आपणही वाचवत होतो हे विसरून, वेळूकरांनी स्वतःची चामडी वाचवायचा प्रयत्न केला तर त्यांची चामडी मात्र तुम्ही तुमच्या लेखणीने लोळवणार हे कसे. वेळूकरांचे इंग्रजी तेवढेसे कसलेले नाही याचा उल्लेख - मी नागपूर विद्यापीठाचा अल्मा मॅटर आहे असे चुकीचे इंग्रजी ते बोलल्याचे लिहून त्यांच्याबद्दलच्या कुलगुरू म्हणून असलेल्या अपेक्षांच्या चिंधड्या उडाल्याचे ते लिहितात. भाषेवर प्रभुत्व नसले, किंवा साहित्य वाचन, व्यासंग कमी असला म्हणजे कुलगुरू काहीही करू शकणार नाही असे म्हणणे हे व्यवस्थापकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपली इतिहासकार-मती तोकडी असल्याचे लक्षण आहे. चारचौघात दुसऱ्याची चूक दाखवली म्हणजे आपण विद्वान ठरतो असे समजण्याची कोती वृत्ती असल्याचे लक्षण आहे.
सच अ लॉन्ग जर्नी हे पुस्तक विथड्रॉ करून नव्या कुलगुरूंनी एक चूक निश्चितच केली असे माझेही मत आहे. परंतु विद्यापीठात करण्यासारखी विद्यार्थीहिताच्या, प्रशासकीय सुधारणांची भरपूर कामे आहेत. ती जरी स्वच्छपणे केली तरी खूप. आणि विद्येशी निष्ठा दाखवणाऱ्या, भले आपल्याशी दुमत असलेल्या विद्वानांचा सन्मान ठेवला तरी खूप.
मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होतेच. सच अ लॉन्ग जर्नी ही काही फार मातब्बर लेखन असलेली कादंबरी मला वाटलीच नाही. त्या कांदबरीच्या भोवतीने पिंगा घालण्याचे तसे काहीच कारण नाही. त्यातील उतारे वाचून दाखवणे वगैरे फालतू ड्रामा अस्थानी आहे. पण आमच्या स्वतंत्र वृत्तीचा अधिक्षेप करण्यास कोणीही धजावू नये अशी काळजी आम्हा सर्वांसकट कुलगुरूंनी घेतलीच पाहिजे. एका चुकीवरून पुढचा धडा शिकणाराच मोठा होतो.
अजूनही आम्हाला आशा आहे....!
Friday, October 22, 2010
Saturday, October 16, 2010
एका सत्यवादीचे पत्र
कॅलिफोर्निया विद्यापीठामधील भौतिकशास्त्राचे प्रोफेसर एमिरेटस असलेले, अमेरिकन विज्ञान-तंत्रज्ञान जगतात अनेक प्रकारे महत्त्वाच्या भूमिका बजावलेले प्रा. डॉ. हेरॉल्ड लुविस यांनी नुकताच अमेरिकन फिझिकल सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र मोठे वाचनीय आहे. सध्याच्या मानवनिर्मित वातावरण बदल आणि जागतिक तापमानवृध्दीच्या सद्दीच्या काळात तथाकथित कन्सेन्ससचा बोलबाला एवढा असताना असले पत्र एखाद्या वैज्ञानिकाने लिहिले आहे हे लोकांच्या नजरेस आणून देणे मला महत्त्वाचे वाटते.
डॉ. लुविसचे पत्र विज्ञानाच्या सर्व पाईकांनाच नव्हे तर ज्ञान आणि सत्याशी निष्ठा असलेल्या सर्वच क्षेत्रांतील लोकांना मननीय वाटेल. त्या पत्राचा अनुवाद पुढे देत आहे.
- प्रिय कर्ट,
सदुसष्ट वर्षांपूर्वी मी जेव्हा प्रथम अमेरिकन फिजिकल सोसायटीचा सदस्य झालो तेव्हा ती अगदी छोटीशी, सौम्य संघटना होती- तोपर्यंत पैशाच्या महापुरात न्हाऊन भ्रष्ट झालेली नव्हती. ड्वाईट आयझेन हॉवरने अर्धशतकापूर्वी आपल्याला या धोक्याबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तर भौतिकशास्त्र हा विषय निवडून आयुष्याचा मार्गक्रम ठरवणे म्हणजे दारिद्र्याचा, सततच्या अभावाचा वसा घेतल्याचेच लक्षण ठरत होते. दुसऱ्या महायुध्दानंतर हे सारे बदलले. त्यानंतर चांगले उपजीविकेचे साधन मिळवण्याचा एक मार्ग म्हणून अनेकजण भौतिकशास्त्राच्या अभ्यासात शिरले. अगदी अलिकडे, म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वी विज्ञान आणि समाजातील एक सामाईक चिंतेचा विषय म्हणून अणुभट्टीच्या सुरक्षा अभ्यासासाठी स्थापन झालेल्या अमेरिकन फिझिकल सोसायटीच्या समितीचा मी अध्यक्ष होतो तेव्हाही, बाहेर या विषयावरून झोंडगिरी करणारे अनेक लोक होते, पण आम्हा भौतिकशास्त्रज्ञांवर प्रमाणाबाहेर दबाव पडण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे जी परिस्थिती आहे तिचे वैज्ञानिक निकषांवर प्रामाणिकपणे मूल्यांकन करणे आम्हाला शक्य झाले. आमच्या कामात काही गोष्टींकडे दुर्लक्ष झालेच तर ते तपासून पहायला आणखी एक ओव्हरसाइट कमिटी होती. त्यात असलेले पिएफ पानोफ्स्की, व्हिकी वाइसकॉफ, आणि हॅन्स बेथ यांच्यासारखे उत्तुंग भौतिकशास्त्रज्ञ आमच्या कामात सहाय्यभूत होते. एका भारलेल्या वातावरणात आम्ही जे काम पार पाडले त्याचा मला अतिशय अभिमान वाटला होता. एपीएसच्या अध्यक्षांना दिलेल्या अहवालात ओव्हरसाइट कमिटीने आम्ही ज्या स्वतंत्र बाण्याने काम केले त्याची नोंद घेतली होती. या अहवालावर दोन्ही बाजूंकडून टीका होईल असेही त्यांनी म्हटले होते. यापेक्षा मोठा गौरव कोणता असणार?
आज किती वेगळे चित्र दिसते आहे. असे उत्तुंग मानव या पृथ्वीवर वावरतच नाहीत, आणि पैशाचा महापूर हेच साऱ्या भौतिक-संशोधनाचे, इतर अनेक गोष्टींचे आणि अनगिनत व्यावसायिक नोकऱ्यांचे उगमस्थान ठरते आहे. मी माझी कारणे स्पष्ट करतोच आहे, त्या कारणांमुळे एपीएसचा फेलो असण्यातला माझा इतके वर्षांचा अभिमान आता गळून जाऊन त्याची जागा शरमेने घेतली आहे. मला यात यत्किंचितही आनंद नाही, पण आणि मला या सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा तुझ्याकडे पाठवून देणे भाग आहे.
आज इतके सारे वैज्ञानिक भ्रष्ट होण्यास आणि एपीएससुध्दा ज्या लाटेत वाहवली आहे त्याला कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग स्कॅम आणि त्याला पाठबळ देणारा अक्षरशः अब्जावधी डॉलर्सचा महापूर. भौतिकशास्त्रज्ञ म्हणून मी प्रदीर्घकाळ काम केले आहे, त्यात पाहिलेला असला स्यूडोसायन्टिफिक- (छद्मवैज्ञानिक) बनाव केवळ एकमेवाद्वितीय असाच म्हणेन. आणि त्याला केवढे प्रचंड यश मिळाले आहे... ज्या कुणाला याबद्दल थोडीजरी शंका असे त्याने मांडी ठोकून क्लायमेटगेटची सर्व कागदपत्रे वाचायलाच हवीत. सारे काही उघड होते. मॉन्टफोर्डच्या पुस्तकात सारे काही संगतवार मांडलेले आहे. माझा असा ठाम विश्वास आहे की कोणताही सच्चा भौतिकशास्त्रज्ञ- नव्हे तर कोणताही सच्चा वैज्ञानिक हे वाचून घृणेने भरून जाईल. मी तर वैज्ञानिकांची नवी व्याख्याच या घृणेच्या आधारे करू शकेन.
मग या आव्हानाच्या संदर्भात एपीएसने काय केले आहे? त्यांनी हा भ्रष्टाचार सर्वसाधारण मूल्य म्हणून मान्य करून टाकला आहे. उदाहरणार्थ-
1- साधारण एक वर्षापूर्वी आमच्यपैकी काही जणांनी काही सदस्यांना या विषयावर एक इमेल पाठवली. एपीएसने त्यात छेडलेल्या विषयांकडे दुर्लक्ष केले, पण एपीएसच्या अध्यक्षांनी आम्ही हे इमेल पत्ते कुठून मिळवले याची कुटील चौकशी सुरू केली. पूर्वी, एपीएस अशा महत्त्वाच्या विषयांवर सदस्यांनी आपापसात चर्चा करावी म्हणून उत्तेजन देत असे. किंबहुना सोसायटीच्या घटनेत हा एक प्रमुख हेतू मानला गेला आहे. आता नाही. गेल्या वर्षभरात जे काही झाले ते चर्चा बंद व्हावी याच दृष्टीने करण्यात आले होते.
2- अनेकांचा विरोध असूनही क्लायमेट चेंजच्या बाजूने जे विधान एपीएसने प्रसृत केले ते अत्यंत घाईघाईने, मोजक्या लोकांना लंचला बोलावून लिहून टाकलेले होते. मी अनेक सदस्यांना ओळखतो, त्यांच्याशी बोलतो, अशा एपीएसच्या सदस्यांच्या विचक्षणेचे त्यात कुठेही प्रतिबिंब नाही. त्यातील काही जणांनी कौन्सिलकडे या मतप्रदर्शनाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. या मतप्रदर्शनातील एक अगदी (अव)लक्षणीय शब्द होता- विज्ञानाच्या दृष्टीने विषारीच- वादातीत सत्य. हा शब्द भौतिकशास्त्रातील अत्यंत नेमक्या बाबींना लागू होतो. या विषयाला तर नक्कीच नाही. ही मागणी होताच एपीएसने एका गुप्त समितीची स्थापना केली. तिची बैठक कधीच झाली नाही, त्यांनी या भूमिकेच्या विरुध्द असलेल्या स्केप्टिक्सना बोलावून कधीही चर्चा केली नाही- आणि तरीही आधीचे विधान संपूर्णतः योग्य असल्याचा निर्वाळा देऊन टाकला. त्या विधानाचा सूर जरा नको इतका तीव्र आहे एवढेच त्यांनी मान्य केले. कुणाचाही आग्रह नसताना वादातीत सत्य हा शब्दही पुराव्यांच्या संदर्भात तसाच ठेवला. अखेरीस, कौन्सिलने संपूर्ण विधान होते तसेच ठेवले केवळ त्यात काही अनिश्चितता असल्याचे नमूद केले आणि मग त्या अनिश्चितता मागे सारून मुख्य विधानाला सरसकट मान्यता देण्यासाठी शब्दबंबाळ स्पष्टीकरणांची भर घातली. ते विधान अजूनही एपीएसची अधिकृत भूमिका म्हणून तसेच विराजमान आहे. त्यात जगभरातील सर्व शासनांना दिलेला सल्ला एपीएसचा बडेजाव माजवणारा आहेच पण गाढवपणाचाही आहे... जणू काही एपीएस म्हणजे कोणी विश्वनियंता आहे- मास्टर ऑफ द युनिव्हर्स. असे नाही... आणि आपली नेते मंडळी असे मानतात याची मला लाजच वाटते. हा काही करमणुकीचा खेळ नाही. आपल्या राष्ट्रीय अस्तित्वाचा प्रश्न यात गुंतलेला आहे, वैज्ञानिकांची संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा कसोटीला लागते आहे.
3- आणि मग दरम्यान क्लायमेटगेट घोटाळा बातम्यांतून चव्हाट्यावर आला. प्रमुख भयकंपवाद्यांची कारस्थाने जगापुढे आली. एवढ्या प्रचंड प्रमाणावरचा वैज्ञानिक घोटाळा मी कधी पाहिला नव्हता आणि त्याचे वर्णन करण्यासाठी मला शब्द सुचत नाहीत. एपीएसच्या भूमिकेवर याच काही परिणाम दिसावा- काहीही नाही. काहीच नाही. हे विज्ञान निश्चितच नाही. काही वेगळ्याच शक्ती यात कार्यरत आहेत.
4- मग आम्ही काही जणांनी या मध्ये थोडा वैज्ञानिक विचार पुन्हा जागवण्याचा प्रयत्न केला... कारण अखेर एपीएसचा कथित आणि ऐतिहासिक हेतू तोच तर आहे. आम्ही आवश्यक त्या- म्हणजे 200 हून अधिक सह्या गोळा केल्या आणि कौन्सिलने क्लायमेट सायन्सवर, त्यातील वैज्ञानिक मुद्द्यावर खुली चर्चा करण्यासाठी टॉपिकल ग्रुप करावा अशा प्रस्ताव ठेवला. यामुळे भौतिकशास्त्रातील खुल्या चर्चेची गौरवशाली परंपरा जपली जणार होती, राष्ट्राच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे योगदान ठरले असते. तुम्ही आम्हाला एपीएसच्या सदस्यांची यादी देण्यास नकार दिल्यामुळे या 200 सह्या गोळा करणं जरा अवघड गेलं हे मी नमूद करू इच्छितो. एपीएसच्या घटनेनुसार सर्व नियमांची परिपूर्ती करून, आमचा हेतू विस्ताराने स्पष्ट करून हा विषय खुल्या चर्चेसाठी यावा म्हणून आम्ही प्रयत्न केले.
5- आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला, घटना गेली खड्ड्यात, तुम्ही आमचा अर्ज स्वीकारायलाच नकार दिलात. त्याऐवजी स्वतःच्या ताब्यात असलेल्या पत्त्यांच्या जोरावर क्लायमेट चेंज आणि पर्यावरणावरील टॉपिकल ग्रुपमध्ये सदस्यांना किती रस आहे याची पडताळणी करण्याचा तुम्ही सुरुवात केलीत. विषय न देता असा ग्रुप करण्याचा प्रस्ताव करण्यात किती जणांना रस आहे असे तुम्ही विचारलेत. तरीही अनेकांनी होकार दिला.(तुम्ही सेक्सबद्दल विचारणा केली असती तर तुम्हाला अधिकच प्रतिसाद मिळाला असता) अर्थातच पुढे असे काहीही झाले नाही. त्यानंतर तुम्ही पर्यावरणाचा भागच वगळलात आणि आता सारे प्रकरण ठप्प आहे. एखादा साधा वकीलही तुम्हाला सांगेल की विषय स्पष्ट न करता अर्जी भरली आणि नंतर रिकाम्या जागा भरू म्हणून सांगितले तर त्यावर कोणीही सह्या करीत नाही. हे सारे करण्यामागचा तुमचा एकच हेतू होता, तो म्हणजे आमचा प्रस्ताव कौन्सिलपुढे नेण्याची घटनात्मक जबाबदारी टाळणे.
6- आमच्या कायदेशीर विनंतीकडे दुर्लक्ष करून स्वतःचा टॉपिकल ग्रुप करण्यासाठी आता तुम्ही आणखी एक गुप्त आणि निष्क्रीय समिती स्थापन करून ठेवली आहे.
क्लायमेट चेंजच्या संदर्भात केलेले दावे तावून सुलाखून घेण्याच्या दृष्टीने काहीही गंभीर स्वरूपाची अभ्यस्त चर्चा घडूच नये म्हणून एपीएसच्या व्यवस्थापनाने सुरुवातीपासूनच हा प्रश्न झुलवत ठेवला आहे. या संघटनेवरील माझा विश्वास उडाला याचे तुला नवल वाटते कां?
इथे मला एक गोष्ट मुद्दाम नोंदून ठेवण्याची गरज वाटते, कारण इतरांच्या अंतस्थ हेतूंची चर्चा करण्यात जरा धोकाच असतो. एपीएसमधील ही कारस्थाने इतकी विचित्र वाटतात की त्याचे सरळसोपे स्पष्टीकरण देणे कठीण आहे. कुणी म्हणतात, आजकालचे भौतिकशास्त्रज्ञ पूर्वीच्यांइतके हुषार नाहीत, पण तसे काही मला वाटत नाही. मला वाटते, अर्धशतकापूर्वी आयझेनहॉवरने म्हटल्याप्रमाणे, याचे मूळ कारण पैसा हेच आहे... या विषयात अब्जावधी डॉलर्सच्या सोबतीनेच प्रसिध्दी आणि चकचकाटही आहे. शिवाय सुंदर, निसर्गरम्य बेटांना भेटी देण्याची संधीही या क्लबच्या सदस्यांना सहजच चालून येते. जर ग्लोबल वॉर्मिंगचा फुगा अचानक फुटला तर, तू अध्यक्ष असलेला तुझा स्वतःचा भौतिकशास्त्र विभाग वर्षाकाठी काही दशलक्ष डॉलर्सना मुकेल. माइक मानच्या गैरवैज्ञानिक वर्तणुकीला माफी देताना पेनसिल्वेनिया स्टेट विद्यापीठाने किंवा फिल जोन्सला माफ करून टाकणाऱ्या इस्ट अँग्लिया विद्यापीठाने या गोष्टींचा विचार केला असणारच. वेगळा निर्णय घेतला असता तर त्याचा आर्थिक भुर्दंड किती पडला असता याचे त्यांना भान नव्हते थोडेच. जुनी म्हण आहे आपली- वारा कुठल्या दिशेने वाहतो हे कळायला तुम्ही काही हवामानतज्ज्ञ असण्याची गरज नसते.
मी काही तत्वज्ञानी नाही, त्यामुळे आपला बृहद्स्वार्थ साधण्याची आंस आणि भ्रष्टाचार यातील अंतर कुठे ओलांडले जाते याचा काही मी विश्लेषक होऊ शकत नाही, पण क्लायमेटगेटबद्दल जी काही कागदपत्रे उपलब्ध आहेत ती वाचून एवढे तर निश्चितच स्पष्ट होते की आता या विषयाचे स्वरुप ऍकेडेमिक राहिलेले नाही.
मला यात कोणत्याही प्रकारे सहभागी व्हायचे नाही, त्यामुळे माझा राजीनामा स्वीकार. आशा आहे की आपण अजूनही मित्र आहोत.
हॅल
हे पत्र वाचल्यानंतर, आपल्या जगाची काळजी वाटणाऱ्या, आणि त्या दृष्टीने जबाबदार वर्तन करण्याची गरज वाटणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्रातील सर्वच प्रचाराबाबत बुध्दीच्या निकषांवर विचार करावा अशी इच्छा व्हावी. पैशाच्या महापुरात वाहून जाणे ही भ्रष्टता असेल पण भावनेच्या महापुरात तर्कबुध्दी गमावणे ही त्यापेक्षाही महाग पडणारी चूक ठरू शकेल.

Friday, October 15, 2010
अभिनंदन
झेवियर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आणि प्राचार्यांचे अभिनंदन.
सच अ लॉन्ग जर्नी हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्याच्या निर्णयाला या विद्यार्थांनी आणि प्राचार्य मस्करेन्हास यांनी आव्हान दिले आहे याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
झेवियर्स महाविद्यालयाकडे स्वायत्तता आहे आणि त्यांनी त्याचा योग्य उपयोग करावा हे सुचिन्ह आहे.
विद्यापीठातील मानभावी विद्वानांनी काही तरी धडा घ्यावा.

Tuesday, October 12, 2010
अविद्येची लॉन्ग जर्नी
बऱ्याच दिवसांत माझे विद्यापीठचा ब्लॉग लिहिला नव्हता. मध्यंतरीच्या काळात सच अ लॉन्ग जर्नी या रोहिन्टन मिस्त्रींच्या पुस्तकावरून नव्या कुलगुरूंनी शिवसेनेच्या दबावापुढे नमतं घेऊन ते ताबडतोब, तडकाफडकी अभ्यासक्रमातून वगळलं म्हणून विद्यापीठाबद्दल, कुलगुरूंबद्दल बातम्या छापून आल्या. अशा पध्दतीने पुस्तक वगळल्याबद्दल विद्वत्क्षेत्रात केवळ अरूण टिकेकरांनीच तेवढा टाईम्स ऑफ इंडियामधून लेख लिहिला. दुसऱ्याच दिवशी आयबीएन लोकमतच्या चॅनेलवर त्याबद्दल चर्चा झाली.
त्यात भाग घेणाऱ्यांत विद्यापीठातील इंग्लिश विभागाचे कोणीच नव्हते.
विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अशा प्रकारे पुढाकार घेऊन एक पुस्तक अचानक अभ्यासक्रमातून मागे घ्यावे हा खरोखरच चुकीचा निर्णय होता. त्याबद्दल अर्थातच सर्वत्र चर्चा होती. पण शिवसेनेच्या गुंडगिरीचे भय सर्वांच्याच मनात इतके घट्ट आहे की त्यापेक्षा होते आहे ते होऊ दे असाच पवित्रा सर्वांनी घेतला. यात विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान होईल, आपल्याला घेराव, मारहाण वगैरे होईल ही भीती होतीच.
शिवाय अनुनयात्मक निर्णय कुलगुरूंनी घेतलेला असल्याने आपण केवळ गप्प बसायचे पण खाजगीत मात्र त्यांच्या अपरिपक्वतेबद्दल, नेभळटपणाबद्दल, अविद्वत् वर्तणुकीबद्दल चर्चा करायची. एवढे करून आम्हाला आमची इंटेलेक्चुऍलिटीची झूल कशी मस्त अबाधित पांघरता आली.
बोर्ड ऑफ स्टडीज्च्या ज्या सदस्यांनी हे पुस्तक अभ्यासक्रमास लावले होते त्यापैकी एकही व्यक्ती त्याच्या बाजूने ठामपणे उभी रहायला धजावली नाही. ते काम नव्या कुलगुरूंनी करायला हवे होते ही त्यांची अपेक्षा होती. ती रास्तच होती. पण त्यांनी स्वतःच्या बुध्दीची, अभिव्यक्ती स्वातंत्र्यनिष्ठेची प्रखरता शिवसेनेच्या समोर सोडा नव्या कुलगुरूंच्या समोर तरी दाखवून दिली कां याचे उत्तर दुर्दैवाने नकारात्मक होते.
नवे कुलगुरू आधीच अदासावंतांच्या अदावतीमुळे आणि अदालतबाजीमुळे जरा अडचणीतच आहेत. त्यांना हे नवीन झेंगट नकोच वाटले असणार. तरीही अशा कसोटीच्या प्रसंगीच कसोटीला उतरण्याची गरज असते हे त्यांनी आता तरी लक्षात ठेवावे. आणि अखेर भिऊन घाबरून काय झाले... शिवसेनेला सांभाळले, त्यांच्या उगवत्या सूर्याला सांभाळले आणि त्यांना 'पदो'पदी ज्यांचा आधार लागेल त्या सत्ताधारी पक्षांच्या लोकांची जोरदार टीका- जाहीर टीका त्यांनी ओढवून घेतली आहे.
मुंबई विद्यापीठात ही कादंबरी ती 2007पासून बीएच्या अभ्यासासाठी लावलेली होती आणि आत्ता त्या सिलॅबसचे अखेरचे वर्ष, अखेरच्या टप्प्यात होते. 1991साली प्रसिध्द झालेली, विदेशात आणि भारतीय विद्वत्-क्षेत्रात गाजलेली ही कादंबरी अचानक आत्ता आक्षेपार्ह कां ठरली?
आमच्या काही भो भो संस्कृतीरक्षक, मर्यादित वाचन आणि मर्यादित बौध्दिक आवाका असलेल्या मित्रांना शिव्यायुक्त वाङ्मय म्हणजे नाके मुरडण्यासारखेच वाटते.
बाळासाहेब ठाकरेंना त्यात शिव्या घातल्या आहेत हे निमित्त करून शिवसेनेच्या एखाद्या तरूण नेत्याला यात स्वतःला मोठं करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांनी हा इश्यू उचलला हे आपल्या या गचाळ राजकीय-सामाजिक संस्कृतीत अगदी अपेक्षित आणि समजून घेण्यासारखेच, साजेसेच आहे.
बोर्ड ऑफ स्टडीज् मधलं स्थान आणि राजकारण हा शैक्षणिक कर्तबगारीचा सर्वोच्चबिंदू मानणाऱ्या काही ऍक्टिव्ह ऍकेडेमिशियन्सकडूनसुध्दा हीच अपेक्षा होती. या कादंबरीत अशा शिव्या आहेत- काय हे... काय हे... शांतम् पापम् वगैरे रान उठवण्याची सुरुवात असल्याच एका शिक्षकाने केली.
ज्या प्रकारच्या लोकांनी हा इश्यू उचलला, त्यांची नैतिकता आणि बुध्दी यांच्या मर्यादा आपल्याला माहीत आहेत. स्वाभाविकच विकतचे दुखणे कोणालाही नको. आम्ही ऍकेडेमिक्स तर बोटचेपेपणात नंबर एक. आम्ही कणखरपणे उभे रहाणार? झालंच!
आम्हाला कधी प्रॉपर्टीचे नुकसान होण्याची भीती वाटणार, कधी आपल्यावर कोणी हल्ला करेल याची, कधी आपल्या तोंडाला कुणी काळं फासेल याची...
आपल्याला सेन्सॉरशिप नको... अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे. पण सारे कसे सहज अलगद तोंडात साखरभरला गुलाबजाम पडावा तसे. आपल्याला विचार प्रवर्तक लेखन हवे, पण त्याच्या संरक्षणासाठी आपण बोटही वर करणार नाही. लागलीच गुडघे टेकून पुस्तक विथड्रॉ करण्याचा निर्णय घेण्यात सारेच पुढे. कोणीही हुं म्हणायला तयार नाही. वैचारिकतेचा बळी पडला तरी चालेल, आपण आपले सुरक्षित राहिलो म्हणजे झाले.
बुकर अवॉर्डसाठी नामांकन झालेली आणि कॉमनवेल्थ अवॉर्ड मिळालेली ही कादंबरी. भारतीय वंशाच्या, आता कॅनेडीयन नागरिक असलेल्या लेखकाने लिहिलेली पुरस्कारप्राप्त कादंबरी म्हणून ती मुंबई विद्यापीठातच लावली होती असे नव्हे तर इतर पाचसहा भारतीय विद्यापीठांतही बीए, एमएच्या इंग्रजी साहित्याच्या अभ्यासासाठी लावलेली आहे..
काही विद्यार्थी भेटले. त्यांनी सांगितलं की त्या कादंबरीतल्या शिव्यांचा विचारही करावा लागत नाही. आपण कादंबरीच्या विषयाचाच विचार करतो. कादंबरी तशी चांगलीच आहे... पण आम्ही बोलत नाही तर विद्यार्थ्यांनी बोलायची हिंमत दाखवावी ही अपेक्षा आम्ही कुठे करावी...
या साऱ्या निमित्ताने उत्सुकता वाटून ही कादंबरी मी वाचून काढली.
साठ -सत्तर- ऐंशीच्या दशकाच्या पार्श्वभूमीवर, पारशी समाजाच्या पात्रांच्या, नायकाच्या दिनक्रमांतून, संवादांतून घडत गेलेली ही कादंबरी आहे. आपणच काय पारशी लोक स्वतःला सुध्दा मॅड बावा किंवा मॅड बावी म्हणवून घेत असतात. आणि जे पटेल ते धश्चोटपणे बोलून टाकायचं हा त्यांचा गुण साधारणतः कॉमन आहेच. कुणालाही साला, साली, बास्टर्ड, रास्कल आणि अनेक असल्या शिव्या ते प्रेमात असतानाही देतात आणि संतापले तरीही देतात. त्यात त्यांना काही फारसे वावगे वाटत नाही. या कादंबरीतील पात्रे त्यांच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, ठाकरे आणि अशा अनेकांवर शिव्या घालत बोलतात. हा त्यांच्या संवादशैलीचा भाग आहे.
ही कादंबरी एका विशिष्ट समाजाच्या दृष्टीकोनातून विशिष्ट कालखंडाची दखल आणि सेक्युलर विचारांवरील भाष्य या दृष्टीने महत्त्वाची आहे.
बांगला देशच्या लढाईच्या वेळी सॅम नगरवाला प्रकरण गाजलं होतं. आताच्या विद्यार्थ्यांना आणि या पुस्तकाला विरोध करणाऱ्या कुणालाही त्याची आठवण तरी असेल की नाही कोण जाणे. त्यावेळी जे काही घडलं त्यात संशयाची सुई इंदिरा गांधीकडे सरळ पॉइंट करीत होती. त्या एका सत्यघटनेचा वरवरचा संदर्भ घेऊन ढोबळ पारशी व्यक्तीरेखा घेऊन लिहिलेली ही कादंबरी मला स्वतःला सुरुवातीला बरी वाटली ती एका वेगळ्या समाजाचे चित्रण असल्यामुळे. उत्तरार्धानंतर मात्र ती ढासळत जाते. नायकाच्या कौटुंबिक कथा आणि व्यथा आणि सॅम नगरवालाशी साधर्म्य असलेली मेजर बिलिमोरियाची कथा यातल्या कशालाच नेमकेपणा येत नाही. सेक्युलर भिंतीच्या कथेचीही तीच तऱ्हा. लेखकाला तसे म्हणायचे नसले तरीही, नायकाच्या कुटुंबियांवर ओढवलेले प्रसंग जादूटोणा- प्रार्थना वगैरेंच्या माध्यमातून सुटल्याचे भासते, हा माझा स्वतःचा या कादंबरीवरचा आक्षेप.
फार काही थोर नसलेली ही जरा वेगळ्या पार्श्वभूमीवरची, वेगळ्या वातावरणातली कादंबरी एसवायच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लावली तर त्यात फार काही विशेष नव्हते. असेही आणि तसेही.
खरे म्हणजे जिच्यासाठी धडधडून आग्रह धरावा असे काही मूल्य या कादंबरीत नाही. माझ्या दोन विद्वान पारशी दोस्तांनी तर ती कादंबरी अगदीच सो सो आहे , तिला विरोध तरी कशाला एवढा... म्हणून विषय गुंडाळून टाकला.
पुस्तकाची म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण गुंडगिरीचा काळ विद्यापीठात सोकावला हे नक्की.
आणि विद्यापीठीय विद्वान अगदी सहज बकाबका मूग गिळून बसतात यावरही शिक्कामोर्तब झालं.
विरोध करणारेही राजकारणी, कादंबरी विथड्रॉ केली म्हणून टीका करणारेही राजकारणीच.
पत्रकारितेचे संरक्षक कवच पेहेनलेल्या दोन-तीन विद्वानांनी निषेध नोंदवला. विद्यापीठाच्या इंग्लिश विभागाच्या कुणी नव्हे तर राज्यशास्त्र विभागाच्या प्रा. उत्तरा सहस्रबुध्दे यांनी आयबीएन् लोकमतवर निसंदिग्धपणे ही कृती चुकीची असल्याचा बाईट दिला.
तेवढं सोडलं तर आमची लक्तरं दिसतंच आहेत.

Monday, August 23, 2010
विद्यापीठ आणि शहर- म्यूझियमचा प्रस्ताव
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जन्माला आलेल्या तीन विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ हे एक. या विद्यापीठाच्या स्थापनेनंतरच्या काळात ज्या अनेकांनी शिक्षण घेतले त्यातील अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. स्वातंत्र्याच्या जडणघडणीत भाग घेतला. मुंबई शहर ब्रिटिशांच्या काळापासूनच देशाची आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर तर ते देशाची आर्थिक राजधानी म्हणूनच मान्यता पावले. या आर्थिक राजधानीतले विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठाला जेवढी प्रतिष्ठा लाभली तेवढी क्वचितच देशातल्या इतर कुठल्या विद्यापीठाला लाभली असेल.
एका वादळी स्थित्यंतराच्या काळात जन्माला आलेलं हे विद्यापीठ नंतरच्या काळात केवळ स्थित्यंतराचे साक्षीदार न रहाता साथीदार बनले. स्वराज्याचे एकाहून एक महत्त्वाचे मोहरे या विद्यापीठाच्या कमानीखालून गेले. भारताच्या आधुनिक इतिहासाशी इतके जवळचे नाते असलेले हे विद्यापीठ. न्याय, अर्थकारण, राजकारण, कला, विज्ञान, भाषा, साहित्य यापैकी प्रत्येक क्षेत्रात या विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक मोहरे या देशाच्या बांधणीत, समाजाच्या घडणीत आघाडीवर राहिले. या मोहऱ्यांची केवळ आडनावं लिहायची ठरवली तरी कितीतरी पृष्ठे व्यावली जातील... घटनांचं बाहुल्य, त्यातील नाट्य हे तर आणखी वेगळं.
मुंबई विद्यापीठाचा आणि मुंबई शहराचा इतिहास एकमेकांत इतका घट्ट विणला गेला आहे की तो वेगवेगळा काढता येणं शक्य नाही. म्हणूनच या विद्यापीठाच्या इमारतीत हा इतिहास बोलका करणारे म्यूझियम असावे ही संकल्पना मी 2007 साली विद्यापीठाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात मांडली होती.
जगातील अनेक नामवंत विद्यापीठांत स्वतःची म्यूझियम्स आहेत. त्यातील काही उदाहरणे इथे देत आहे. रशियात कझान विद्यापीठाचा इतिहास मांडणारे म्यूझियम आहे. 1979 साली हे म्यूझियम सुरू करण्यात आले. 1798 साली या विद्यापीठाची जी मुख्य इमारत बांधण्यात आली होती त्याच मुख्य इमारतीत हे त्यांच्या विद्यापीठाच्या इतिहासाचे म्यूझियम करण्यात आले आहे. 1200 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत हे म्यूझियम असून त्यामध्ये जुनी महत्त्वाची कागदपत्रे, छायाचित्रे, चित्रे, अत्यंत जुनी, दुर्मिळ अशी हस्तलिखिते आणि पुस्तके, विद्यापीठांमध्ये जागतिक कीर्तीचे संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी वापरलेली साधने, यंत्रे या साऱ्यांचे जतन आणि प्रदर्शन यात करण्यात आले आहे. एकूण 1500 प्रदर्शनीय वस्तू आणि अनेक कागदपत्रे यात आहेत.
एस्टोनियामधील तार्तु विद्यापीठाच्या म्यूझियमची कथाही जाणून घेण्यासारखी आहे. युरेशियामधील एस्टोनिया या एका छोट्या पण प्रगत देशाच्या तार्तु विद्यापीठाने स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान ओळखून स्वतःच्या इतिहासाचे म्यूझियम केले आहे. डिसेंबर 1976मध्ये हे म्यूझियम सुरू झाले ते विद्यापीठाच्या तळघरात. पण अवघ्या काही महिन्यांतच ते विद्यापीठाच्या जुन्या ऐतिहासिक ग्रंथालयाच्या इमारतीत हलवण्यात आले. हे ग्रंथालय म्हणजे 13व्या शतकात बांधली गेलेली एका मूळ कॅथेड्रलची इमारत होती. विद्यापीठ इतिहासाच्या म्यूजियमची प्रतिष्ठा ओळखणारे बुध्दीवंत तेव्हा सुदैवाने तेथे होते म्हणूनच हे घडू शकलं. 16व्या शतकातील युध्दांची झळ पोहोचलेल्या या इमारतीवर 1985मध्ये या विद्यापीठाने सढळहस्ते खर्च करून ती अतिशय सुरक्षित आणि सुंदर बनवली.
या म्यूझियममध्ये 1632 ते 1995पर्यंतचा तीन शतकांचा इतिहास जपला आहे. यात जुनी वैज्ञानिक साधने, प्रयोगशाळा, वैज्ञानिकांचे कार्य. विद्यार्थी संघटना आणि विद्यार्था जीवनाचा इतिहासही मांडला आहे. दरवर्षी तेथे विद्यापीठ आणि इतिहास या वि,यांवरील अनेकविध अशी किमान 15 तरी प्रदर्सने भरवली जातात. या म्यूजियमची स्वतःची दोन सभागृहे आहेत. त्यापैकी एकात संगीताचे कार्यक्रम नियमितपणे होतात.
एकंदर 65,000 वस्तू आणि अनेक कागदपत्रे येथे प्रदर्शनात मांडून ठेवलेल्या आहेत.
केंब्रिज विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, येल विद्यापीठ... या सर्व विद्यापीठांत स्वतःच्या इतिहासाचे दर्शन घडवण्यासाठी भव्य दालने, वॉक-वेज् यांमधून म्यूझियम्स आहेत. या शिवाय या सर्व विद्यापीठांची स्वतःची अशी विविध विषयांवरची इतर म्यूझियम्सही आहेत. पुरातत्व, पुराभिलेख, कलात्मक वस्तू, शिल्पे, चित्रे, स्त्रीवादी कलविषय, विज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र अशा नानविध विषयांवरची भव्य म्यूझियम्स ही त्या त्या विद्यापीठांची शान आहे.
आज दोनशे ते सहाशे वर्षांचा इतिहास असलेली ही सारी विद्यापीठे आहेत, पण त्यांतील म्यूझियम्सच्या उभारणीची सुरुवात फार पूर्वीच झाली आहे.
कझान विद्यापीठाच्या म्यूझियमबद्दल एक माहिती. आपल्या विद्यापीठाच्या इतिहासाचे, आपल्या राजकीय आणि शैक्षणिक इतिहासाचे म्यूझियम व्हावे ही कल्पना येफिम बुश्कानेत्स याने प्रथम मांडली. त्यानंतर तीस वर्षांपर्यंत याबाबत चर्चा आणि चर्चा याखेरीज काहीच घडले नाही. अखेर 1979मध्ये या विद्यापीठाची 175 वर्षे पूर्ण झाली तेव्हा शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षात हे म्यूझियम साकार झाले. आज हे म्यूझियम कला आणि विज्ञानप्रसाराचे प्रमुख केंद्र म्हणून शहराच्या सांस्कृतिक जीवनाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
आपल्या इतिहासाला साजेसं आपलं कार्य असावं अशी जाणीव करून देण्याची क्षमता इतिहासाच्या पुस्तकात जेवढी असेल त्यापेक्षा कैकपटीने अधिक प्रभाव म्यूझियममधील इतिहास दर्शनाने होतो. पुस्तक घेऊन वाचणारांपेक्षा प्रेक्षणीय स्थळ म्हणून म्यूझियमला भेट देणाऱ्यांची संख्या जास्त असते. म्हणूनच विद्यापीठाचा इतिहास लिहिला गेला असला तरीही विद्यापीठ चरित्र लोकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर जिवंत होण्यासाठी म्यूझियमची गरज आहे. कझान किंवा अन्य कुठल्याही विद्यापीठ म्यूझियमच्या उदाहरणावरून हेच स्पष्ट होते की असे म्यूझियम विद्यापीठाच्या एखाद्या गौरवशाली इमारतीतच असायला हवे. त्या इमारतीचा प्रत्येक कठडा, प्रत्येक खांब, प्रत्येक टाइल, प्रत्येक खिडकी, तिच्या कोनशीलेसह प्रत्येक दगड हा त्या म्यूझियमचा भाग व्हायला हवा.
मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात राजाबाई क्लॉक टॉवरच्या इमारतीत तळमजल्यावरील दोन दालनांमध्ये असे म्यूझियम व्हावे अशी माझी संकल्पना होती. तत्कालीन कुलगुरूंनी प्रथमतः या प्रस्तावाचे स्वागत करून एक समितीही स्थापन केली. या समितीमध्ये माझ्याबरोबर श्री. सदाशिवराव गोरक्षकर, त्यांचे दोन जुने सहकारी आणि ग्रंथालयाच्या दोघी सहकारी होत्या. या ग्रंथालयाच्या दोघींचा या प्रस्तावास पाठिंबा नव्हता. कारण पुस्तके कुठे ठेवणार, अभ्यासक कुठे बसणार असा त्यांचा प्रश्न होता.
खरे म्हणजे या ग्रंथालयातील अनेक ग्रंथ, महाग्रंथ, कलाविषयक ग्रंथ, प्राचीन ग्रंथ, तालपट्टिका हे आता संदर्भग्रंथ म्हणून हाताळले जाण्यापेक्षा म्यूझियम पीसच्या संज्ञेला पोहोचले आहेत.
यातील अनेक ग्रंथ अनेक काळापासून खालच्या भव्य दालनांपैकी एका दालनात एका लांबलचक टेबलखाली ठेवलेले आहेत. ओब्लॉन्ग टेबलखाली ठेवलेले म्हणून त्याला ओब्लॉन्ग कलेक्शन असे गोंडस नाव देऊन तो ग्रंथसंग्रह उघडाच पडलेला आहे. काही काल तरी बोअरर्स, कसर युक्त जुनी टाकून देण्याची टेक्सटबुक टाइपची पुस्तके त्यावरच रचून ठेवलेली मी स्वतः पाहिली होती. खरे म्हणजे ही ग्रंथसंपदाच अशा म्यूझियमची सर्वात महत्त्वाची ठेव असेल. त्यामुळे त्यांच्या या आर्ग्युमेंटला काही अर्थ नव्हता.
दुसरा प्रश्न असा होता की अभ्यासक कुठे बसणार...
मी स्वतः एक महिनाभर लक्ष ठेवून निरिक्षण केले होते, या दोन दालनांपैकी एकात जे पीएच्डी संशोधन करणारे अभ्यासक बसतात त्यांची संख्या अक्षरशः बोटांवर मोजण्यासारखी आहे. कधी तीन, कधी सात, कधी चार, कधी सहा... जास्तीत जास्त संख्या वर्षातील एका दिवशीच होती- अकरा. हे अभ्यासक सहजपणे वरच्या मजल्यावर बसू शकतील एवढी जागा वरही आहे.
ग्रंथालयाचा इतरही वापर फार थोडे लोक करतात याचं प्रमुख कारण, या विद्यापीठातील पदव्युत्तर अध्यापन आणि संशोधन- विधि विभाग वगळता- आता सांताक्रूझ पूर्वेच्या विद्यानगरी परिसरात हलवण्यात आले आहेत याला आता तीन दशकं लोटली. या मधल्या वर्षांत दक्षिण मुंबईत रहाणाऱ्या मोजक्या ग्रंथप्रेमी व्यक्ती ते ग्रंथालय वापरतात. जवळ रहाणारे काही विद्यार्थी परीक्षेपुरता काळ ही जागा अभ्यासाला बसण्यासाठी वापरतात. खालच्या दोन मजल्यांवर म्यूझियम केले तरीही यांचा कुणाचाही तोटा होणार नाही इतकी रिकामी बसण्याची जागा वरच्या दालनांतही आहे.
पण हे ग्रंथालय म्हणजे स्वतःचे संस्थान असल्यासारखा दृष्टीकोन अरूण टिकेकरांसारखे लोक बाळगतात. म्यूझियमच्या आराखड्यावर विचार करण्याच्या कामाला सुरुवात केल्याचे कर्णोपकर्णी होताच या संकल्पनेला पहिला विरोध केला तो विद्यापीठ इतिहासाचे पुस्तक लिहिणाऱ्या या अरूण टिकेकरांनी. त्यांना गोरक्षकरांनी काही उत्तर दिले तोच टाटा कन्सल्टन्सीकडून राजाबाई टॉवरच्या संवर्धनाचा प्रस्ताव आला. यात इंटॅक, गरवारे बाई सारेच गुंतले. त्यांनी म्यूझियमचा प्रस्ताव गुंडाळून टाकणे कुलगुरूंना भाग पाडले असेल असे मानायला जागा आहे. कारण या संवर्धनाच्याच नावाखाली ग्रंथालयाचे खालचे एक दालन कॉम्प्युटराइज्ड वर्ल्ड गेटवे लायब्ररीसाठी त्यांच्या ताब्यात देण्याचाही प्रस्ताव होता.
या प्रस्तावापुढे आणि कुठल्यातरी कोपऱ्यातून येणाऱ्या दडपणापुढे तत्कालीन कुलगुरूंनी मान तुकवली. या संदर्भात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा हा विषय म्यूझियम समितीला कळवण्याचीही तोशीस त्यांनी घेतली नाही. त्यापुढे जी काही वादावादी झाली, मराठी वृत्तपत्रांमध्ये हा विषय पोहोचला, बातम्या आल्या त्यातून टाटा कन्सल्टन्सीचा प्रस्तावही बासनात गेला आणि म्यूझियमचाही.
कणखरपणे, ठामपणे काही निर्णय करावे एवढा रस खोलेसरांना निश्चितच नव्हता.
आज हा विषय पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, 2011 साली राजाबाई क्लॉक टॉवर, आणि पदवीदान सभागृह या इमारतींचा वास्तुशिल्पी सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांची जन्मशताब्दी येते आहे. त्यानिमित्ताने इतिहास उजळणारे काही कार्यक्रम करावेत अशी कल्पना मांडली जात आहे. प्रेमचंद रॉयचंद यांचे नातू सुशील रॉयचंद यात पुढाकार घेत आहेत. नव्या कुलगुरूंनाही या संदर्भात काही करावेसे वाटते आहे.
कुणाला काही नवीन उभारण्याची आस असेल तर म्यूझियमचा प्रस्ताव पुनरुज्जीवित होण्याची शक्यता असू शकेल.

Friday, August 20, 2010
दूरशिक्षणाचा दगड बहिःशालवर
आज लोकसत्तामध्ये प्रतिभा कामत नावाच्या बाईंनी माझ्या 13 जुलैच्या पत्राचा संदर्भ वापरून एक पत्र लिहिले. त्यात मला चुकून बहिःशाल शिक्षण विभागाच्या संचालकपदावरून उचलून दूरस्थ शिक्षण विभागाच्या संचालकपदी बसवले. विद्यापीठासंदर्भात टीका करणाऱ्या माझ्याच विभागात कसा सावळागोंधळ आहे हे दाखवण्याचा त्यांचा इरादा होता. त्यामुळे लोकसत्तात तातडीने पत्र पाठवून खुलासा केला आहे.
पण त्यांच्या पत्रातील दूरस्थ शिक्षण विभागावरील सर्व टीका यथायोग्यच आहे, हेही तितकेच खरे.
आपण कॉम्प्युटरायझेशनच्या या जमान्यात आहोत असं कुणाला खरंही वाटणार नाही आमचा दूरस्थ शिक्षण विभाग पाहून.
या काळात दूरस्थ म्हणवणाऱ्या शिक्षणसंस्थेची फी भरायला विद्यार्थ्यांना कामधंदे टाकून लांबलांब रांगा लावाव्या लागतात. कार्यकौशल्याचे नावही घ्यायला नको. कामतबाईंनी म्हटल्याप्रमाणे नोट्स् वगैरेंचा आनंदच असतो.
पण हे काहीही न देणारे दूरशिक्षण घ्यायला लाखोंच्या संख्येने विद्यार्थी येतात हीच गोष्ट किती दुर्दैवी आहे. काहीच मार्ग नाही म्हणून ते येतात. संपर्कव्याख्याने घेणारे शिक्षकही सारी परिस्थिती पाहूनही कधीही काहीही बोलत नसावेत. नाहीतर या प्रतिभा कामतांना आपण ज्या संस्थेत संपर्क व्याख्याने घेतो त्या संस्थेचे संचालक कोण हे तरी माहीत असायला हरकत नव्हती.
सारेच आपल्या टोपल्या टाकून मोकळे होतात, मग कोणी कोणाला बोलावे.
बोलण्याचा हक्क बजावायचा असेल तर आधी आपण आपले काम निष्ठेने करतो आहोत कां हे आपण साऱ्या शैक्षणिक, बौध्दिक लोकांनी तपासून पाहिले पाहिजे.
पार्श्वभागावर एक शिक्का उठवून घ्यायचा म्हणून प्रवेश घेणारे विद्यार्थी जसे शिक्षणाचा दर्जा खाली आणतात तितकेच, आपल्याला तास घ्यायला मिळतात तेवढे घेऊन मोकळे व्हायचे- बाकी उठाठेव करणारे आपण कोण म्हणणारे शिक्षकही.
काही वर्षांपूर्वीची- म्हणजे 1996ची गोष्ट आहे. दूरशिक्षण विभाग तेव्हा आमच्या फोर्ट कॅम्पसमध्ये होता.
देशमुख मॅडमनी नुकतीच साऱ्या इमारतीची रंगरंगोटी करवून घेतली होती.
सप्टेंबर महिन्यात दूरशिक्षण विभागाकडे प्रवेश घेण्यासाठी रांग लागली होती. कित्येक तास मुलेमुली, पोरं घेऊन उभ्या असलेल्या नवमाता, वाढत्या वयात ग्रॅज्युएशन करण्याची हौस पुरी करण्यासाठी आलेले प्रौढ- सारीच गर्दी ताटकळत रांगेतून... खालच्या बागेतून, पहिल्या मजल्यावर, तिथून वळतवळत दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलेल्या रांगेत खोळंबत होती. हे सारे अखेरच्या चार दिवसांत प्रवेशासाठी जागे झाले म्हणून त्यांना ती शिक्षा भोगावी लागते असं एक समर्थन ऐकायला मिळालं होतं. वर पोहोचल्यावर हिडीसफिडीस होतीच .
रांग संपून गेल्यानंतर मी वाचलं होतं... ऑफ व्हाईट रंगाने रंगवलेल्या कठड्यावर कुणातरी संतापलेल्या, फार काही चांगलं वळण नसलेल्या मुलाने खरडलं होतं... All university staff is xxxx.
पंधरा वर्षांनंतरही परिस्थिती तशीच?

Friday, August 13, 2010
भिकारडेपणाचे मूळ उच्च पातळीवरच्या मोठ्या भ्रष्टाचारात
आधीचा ब्लॉग लिहिला आणि कर्मचारी संघटनेच्या सदस्यांना दाखवला. या बाबतीत काही करूया अशी आस तर प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवली.
पण त्यांनी आणखी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यातून बसलेल्या धक्क्यातून अजून सावरायचं आहे.
या लोकांनी जेजे काही सांगितले त्याची सीमा अफाट आहे. परीक्षा विभाग, छपाईची कंत्राटे, तात्पुरती नोकरभरती या क्षेत्रात चालणाऱ्या भ्रष्टाचाराबरोबरच इतर गैर-विद्यापीठीय नेत्यांची, संघटनांची, बिल्डर्सची, खाजगी धंदे चालवणाऱ्यांची दहशत इतकी जबरदस्त आहे... की कोणी कर्मचाऱ्याने एवढेच काय संघटनेच्या नेत्यानेही आवाज करण्याचा प्रयत्न केला, विरोध करून एखादे कृत्य रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला नेस्तनाबूत केले जाईल इतकी मोठी समांतर यंत्रणा इथे नांदते.
ते म्हणाले हे जे तुम्ही लिहिलंय हे तर अगदी क्षुल्लक आहे. वरची पोखरलेली यंत्रणा सुधारली तर खालच्या फुटकळ लोकांची काय बिशाद होईल असं काही करण्याची. परीक्षा विभागासारख्या महत्त्वाच्या विभागात 494 तात्पुरते कर्मचारी आहेत. चार-पाच हजार पगार घेऊन काम करणारे हे कर्मचारीही कुणीतरी, कुणाच्या मार्फत तरी भरलेले असतात... संधी मिळताच असले पैसे काढण्याचे उद्योग जास्तीत जास्त तीच भरती करते असे या नेत्यांचे मत होते. त्यात तथ्यही असेल. पण त्यांच्यावर आपले कायम कर्मचारी अंकुश ठेवत नाहीत कां- याचे उत्तर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या असुरक्षिततेच्या भावनेकडे वळवले.
विद्यापीठातील उच्च पातळीवरील भ्रष्टाचाराच्या त्यांनी सांगितलेल्या कथा अविश्वसनीय वाटाव्यात अशा पण खऱ्याच आहेत. सारे काही बाहेर काढायचे तर या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची सुरक्षितता हवी. शारिरीक आणि नोकरीचीही.
मागे एकदा कुलगुरू भालचंद्र मुणगेकरांच्या काळात, मुद्रण विभागाने छपाईचे कंत्राट जास्त पैसा देऊन राज्याबाहेर दिले त्याबद्दल चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलल्याबद्दल बोलणाऱ्यावर माध्यमांशी बोलण्याची अनुमती न घेता बोलल्याबद्दल कारवाई करण्यात आली. सात महिने सस्पेंडेड. एकाला एकदा अशी भीती घातली की सारे आपसूक सरळ येतात. गप्प रहातात.
जर काही बदल घडवू आणायचा असेल तर असल्या भीतीचे प्रथम निराकरण करावे लागेल.
मी माझ्या पहिल्या ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले होते-
गेली काही वर्षे या विद्यापीठात काम करणारे कित्येक निष्ठावंत विद्वान आणि कर्मचारी आता वीट आला या विद्यापीठाचा म्हणतात. हे म्हणताना त्यांची मने भळभळत असतात. सोडून जाऊ म्हणतानाच या विद्यापीठासंबंधी अजूनही जिवंत असलेला लोकादर पाहून पुन्हा त्यांची पावले अडखळतात.
ही परिस्थिती सुधारण्याची इच्छा असेल तर विद्यापीठावर, विद्यापीठात असणाऱ्यांवर सुजाण टीका होत रहायला हवी. कोणी कुठेही वृत्तपत्रांत बोलू नये, लिहू नये, आपली लक्तरे बाहेर टांगू नये अशी अपेक्षा या क्षेत्रात असताच कामा नये. विद्यापीठाची लक्तरे विद्यापीठीयांनीच दाखवायला हवीत. कारण विद्यापीठाला नवीन वस्त्रे हवी आहेत. कारण विद्यापीठाची वस्त्रे हीच या देशातील युवकांची वस्त्रे असणार आहेत.
विद्यापीठाच्या हितासाठी आपली फाटकी लक्तरे बाहेर टांगायलाच हवीत हे माझे मत मी पुन्हा एकदा अधोरेखित करते आहे.
व्हिसलब्लोअर म्हणतात असे लोक पुढे आले तरच आपली परिस्थिती सुधारायची आशा आहे.
त्यांना विश्वासात घेऊन नव्या कुलगुरूंना काही नवीन सुरुवात करता येईल.
अत्त्युच्ची पदी पोहोचता थोरही बिघडतो हा बोध आहे खरा- असे म्हटले जाते. पण पद हीच काही इतिश्री नाही हे कळले तर माणसं त्यावर मात करू शकतात.
सध्या प्रशासनात राहून प्रशासनाच्या भ्रष्टाचारावर खुलेपणाने बोलल्यास त्याला घटनात्मक संरक्षण कसे मिळेल हे सांगणारा कायदेपंडित मी कर्मचारी संघटनेसाठी शोधते आहे. आपली मदत असावी.

Thursday, August 12, 2010
किळसवाणा भिकारडेपणा
काल माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला.तिच्या परिचितांपैकी एका विद्यार्थ्याने लॉच्या पेपर्सपैकी एका पेपरचे रिव्हॅल्यूएशन करायला विद्यापीठाच्या परीक्षाविभागात अर्ज केला होता. त्यात त्याचे मार्क्स वाढण्याऐवजी कमी झाले. म्हणून त्याने पुन्हा अर्ज केला होता. ही तांत्रिक चूक होती. पण ती निस्तरली जात नव्हती. मी माझ्या विभागातील हेडक्लार्कला सोबत देऊन त्याला परीक्षा विभागात पाठवले होते. त्या बाई स्वतःच म्हणाल्या मदत करा म्हणून मी स्वतःच सांगून येते,नाहीतर आपले लोकं मुलांना उभंच करत नाहीत. त्यानंतर त्याचं काम झालं असेल असं आम्ही गृहीत धरलं.
काल मैत्रिणीने सांगितलं- परीक्षा विभागातून ते काम उगाचच खोळंबत होतं म्हणून त्या मुलाची आई इथे आली. तिची अवहेलना झाली ती इतकी की ती तिथेच रडू लागली. मग एकूण चार टेबलांवर प्रत्येकी पाचशे रुपये वाटले तेव्हा ती तयार असलेली फाइल बाहेर निघाली. फाइल हातात देताना पुन्हा एकदा देणाऱ्याने मंत्र जपला- कुछ द्येव ना... पुन्हा पाचशे रुपये दिले.
काहीही चूक नसलेला, सुधारणेची गरज नसलेला आपला कागद हलायला इतकावेळ आणि लाच द्यावी लागते तर- चूक असेल तेव्हाचा रेट काय असेल त्रैरासिक मांडा.
ही गोष्ट पकडून दिली जाऊ शकत नाही, केस होऊ शकत नाही, कारण लाच देणाऱ्या मुलानेही चूकच केली आहे. आपल्याला एखादी गोष्ट लवकर मिळणे गरजेचे आहे हे सांगितले की असले भिकारडे लोक आणखी गैरफायदा उकळतात.
आता सिक्स्थ पे कमिशनचे पगार चांगले झाले आहेत तरीही काही कर्मचाऱ्यांचा हा भिकारडेपणा संपत नाही. ही गोष्ट कुलगुरूंच्या कानावर घातली असता त्यांनी कारवाई करू या म्हणून तयारी दखवली, पण कशी करणार कारवाई... कुठल्या आधारावर...
पण मला खात्रीच आहे- हा मुलगा, जो कायद्याचा विद्यार्थी असून काम काढण्यासाठी आणि पुढे त्रास होईल या भीतीने लाच द्यायला तयार झाला,तो पुढे येऊन लाच मागणाऱ्या,घेणाऱ्या माणसांकडे बोटही दाखवणार नाही.शिवाय पुरावा नसेल तर सत्य हा पुरावा होऊ शकत नाही हे तर लोकशाही न्यायव्यवस्थेचे गमक आहे.
मागे एकदा एंजिनिएरिंग विषयात मास्टर्स करणाऱ्या तीन मुलींची केस माझ्याकडे अशीच ओळखीतून आली होती. त्यांच्या गाईडच्या प्रश्नाचा गुंता विद्यापीठाने आणि कॉलेजने मिळून केला होता. तेव्हा परीक्षा नियंत्रकांकडून त्यांना अत्यंत वाईट वागणूक मिळाली होती.
एकंदरच आमचा परिक्षाविभाग संवेदनाहीन पध्दतीने वागतोच.
मला काही लोक म्हणाले, अहो मॅडम, तुम्ही काय या बारीकसारीक गोष्टीने व्यथित होताय... हे तर काहीच नाही.
कुलगुरूपदावरील व्यक्तीने आपण काय करू शकतो अशी हतबलता दर्शवली तर मग संपलंच.
आता तंत्रज्ञान पुढे गेलं आहे. त्याचा वापर करा, सर्वत्र सीसीटीव्ही बसवा. कारवाई करायची तर पुरावे मिळतील याची व्यवस्था करा.
आणि मुख्य म्हणजे आपण भिकारडेपणा करता आहात याची या संबंधित कर्मचाऱ्यांना थोडी जाणीव करून द्या. त्यांची लाज काढा.
भ्रष्टाचार केला तर गाढवावरून धिंड काढण्याची शिक्षा अंमलात आणली तर आमच्याकडे देशातली गाढवं कमी पडतील.
नाहीतर अँटीकरप्शनब्यूरोची एक चौकीच इथे बसवायला हवी.
विद्यापीठाच्या प्रांगणात शिक्षण प्रक्रियेच्या ऐन भरात असताना आमच्याकडूनच मुलांना भ्रष्ट होण्याचा पहिला धडा मिळतो. शरम वाटते. या विद्यापीठाच्या नावाने काम करण्याची शरम वाटावी असले हे भिकारडे आमच्या सोबत काम करतात. किळस तरी किती करावी?
विद्यार्थी संघटना, कर्मचारी संघटना यांना हे दिसत नाही?
Wednesday, August 11, 2010
जैवतंत्रज्ञानाचे मुंबईचे विद्यार्थी कच्चे!
आज एक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील वैज्ञानिक माझ्याकडे आले होते. एका मोठ्या कंपनीत नोकरीवर असल्यामुळे त्यांच्याकडे अनेकदा जैवतंत्रज्ञानाचे विद्यार्थी अनुभव घेण्यासाठी, शिकाऊ म्हणून तर कधी नुसते पहाण्यासाठी येतात. त्यांनी सहज सांगितलं ते दुखावून गेलं. ते म्हणाले, आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईहून आलेले विद्यार्थी अगदीच कच्चे असल्याचं दिसतं. साध्यासाध्या गोष्टी त्यांना येत नसतात. माहीतच नसतात. त्यांना काय कसं शिकवतात कोण जाणे. साधं 10एक्स सोल्यूशन करायला सांगितलं तरी त्यांना तीनतीनदा समजावून द्यावं लागतं. त्या मानाने पुण्याचे, बारामतीचे विद्यार्थी खूप तयारीचे असतात. लॅबमध्ये कामं केलेली आहेत हे कळतं. काय प्रकार आहे हा... कां असं तुमच्याकडे?
मी मान खाली घातली.
आपली मान खाली गेली आहे...
असं कां होतंय याची जबाबदारी कोणाची...
आज जगभरात जैवतंत्रज्ञानाचं महत्त्व वाढतंय. 2025 नंतर जगाची भूक समर्थपणे भागवण्याची शक्ती फक्त जैवतंत्रज्ञानात आहे हे लख्ख आहे. आरोग्यक्षेत्रातही तेच होणार आहे. आपण फक्त व्याख्या पाठ करवून घेऊन पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थी बाहेर धाडले तर ते असमर्थ ठरलेले, आणि म्हणून अवहेलना सोसणारे विद्यार्थी नंतर आपल्या मातृसंस्थेचा कान चावायला येतील याचं तरी पुस्तकी शिकवणाऱ्या शिक्षकांनी, संस्थांनी भान ठेवावं.
आवश्यक ती गुणवत्ता आणण्यासाठी खूप पैसा आणता येतो. निष्ठा मात्र अंगभूत असावी लागते.
कुणीतरी बोला यावर!

Monday, August 9, 2010
श्री3 आणि मंडळी
काल माझ्या मुलाने त्याच्या विश्वातली एक घटना सांगितली. विवेकनिष्ठ, तर्कशुध्द विचार करण्याचे वळण असलेला हा माझा मुलगा त्याच्यावर पडलेल्या दबावाचा अगदी सहजच सामना करू शकला. पण त्याच्याबरोबरच्या इतरांना मात्र तो एक पंथ जॉईन करण्याच्या निर्णयापासून परावृत्त करू शकला नाही.
इतरांनाही शहाणे करून सोडण्याची अजून त्याची बौध्दिक तयारी व्हायची आहे म्हणा किंवा त्याचे मत ऐकून घेणे महत्त्वाचे वाटावे इतकीसुध्दा त्या इतरांची बौध्दिक तयारी नसावी म्हणा.
निमित्त होते आजकालचे एक प्रसिध्द गुरू श्रीश्रीश्रीरविशंकर यांच्या अनुयायांत सामील होण्याचे. तरुणांना आकर्षित करून त्यांना आपल्या ताफ्यात जमा करण्यासाठी या बुवाने आता एक येस क्लब काढला आहे.
फक्त तीन हजार रुपये भरायचे-- की मग तुम्हाला काय काय लाभ. लाभच लाभ. स्ट्रेसपासून मुक्ती, विश्वशांती, विश्वप्रेम, शारीरिक पीडांपासून मुक्ती... आणि हिज होलीनेसचा दिव्य सहवास जो लाभताच चेहऱ्यावर असं काही तेज उमलतं...हे सारं त्याला त्याच्या मित्राचा एक तरुण पाहुणा सांगत होता. त्याच्या मित्राच्या मैत्रिणीने त्याला कन्व्हिन्स केलं होतं. मग इतर मित्रांनाही कन्व्हिन्स करण्याची संधी श्रीश्रीश्रीच्या ताफ्याने हस्तेपरहस्ते साधली होती. टाइमपास म्हणून घरी बोलावून त्या मित्राने या दहाबारा मुलांच्या टोळक्याला श्री3च्या निरागस दलालाचं भाषण ऐकवलं. स्ट्रेसमुक्ती, विश्वप्रेम, अध्यात्म याच बरोबर आता बिझनेस नेटवर्किंगची प्रासादिक भाषाही असल्या दीक्षाविधीमध्ये खळखळू लागली आहे. आणि तीन हजार रुपयांची दक्षिणा देताना करारपत्रही करून घेतले जाते. त्यात श्री3ची स्पेशल सुदर्शन क्रिया -जी केल्याने तुमचे सारे आजार दूर पळणार म्हणजे पळणार- इतर कोणाही ऐऱ्यागैऱ्याला न शिकवण्याच्या करारावर सही करायची असते.
श्री3चे भक्त त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात अशी त्यांची प्रभा आहे. लोक म्हणे कर्ज काढूनही त्यांच्या सहवासासाठी खर्च करतात... म्हणजे त्यांचे बिझनेस क्लासचे अमेरिकेचे तिकिट काढून त्यांच्यासोबत प्रवासाची संधी घेणे. जाऊ दे त्या मूर्खपणाला मर्यादाच नाही.
माझ्या विवेकी मुलाने त्यांच्या प्रत्येक समर्थनाचा पराभव केला आणि मला तुमच्यात सामील व्हायचे नाही असे स्पष्टच सांगितले. स्ट्रेस मुक्ती, चांगली शिकवण, प्रेझेन्टेशन स्किल्स, नेटवर्कच्या संधी सारे काही मी माझ्या बुध्दीबळावर साध्य करू शकतो असे बजावून त्याने पाठ फिरवली.
पण कितीजण अशी पाठ फिरवतील...
श्री3चे संमोहन अनेक संस्थांवर पडले आहे. युनेस्कोच्या काही कार्यक्रमांत त्यांचे प्रमुख या संमोहनाखाली आल्यामुळे त्यांच्या आर्टऑफ्लिव्हिंगचा कोर्स कंपल्सरी केला गेला होता असे मी ऐकले आहे. अनेक शिक्षण संस्थांमध्ये त्यांचा चंचुप्रवेश झाला आहे. दरडोई तीन हजार घेऊन हॉल वगैरे बुक करण्याचा खर्च म्हणे ते भागवतात. भलतंच आर्टिस्टिक झालं हे आर्टऑफ्लिव्हिंग.
पाच वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठातल्या एका प्राध्यापिकाबाईंना या आर्टऑफ्लिव्हिंगची बाधा झाली होती. त्यांनी अगदी ऍकेडेमिक कौन्सिलपर्यंत हा विषय घेऊन मजल मारली होती. हे कोर्सेस आपल्याकडे सुरू करावेत असे त्या सांगत होत्या. सुदैवाने दुसऱ्या एका प्राध्यापिकेने त्याला जोरदार विरोध दर्शवला- आणि असल्या गोष्टी करण्याचे विद्यापीठ हे ठिकाण नव्हे म्हणून ठणकावून सांगितले. तो विषय तिथेच संपला. मग त्या श्री3वाल्या बाई माझ्याकडे आल्या. बहिःशालचे कोर्सेस इतके छान, इतके विविध असतात तर तुम्हीच करा ना हा आर्टऑफ्लिव्हिंगचा कोर्स- त्यांचं वाक्य पुरं व्हायच्या आतंच मी श्री3चा जमाखर्च मांडायला सुरुवात केली. आणि त्या निघाल्याच.
गेले वर्षभर मी ऐकून आहे, की या श्री3वर हिरीरीने आपला वेळ घालवणाऱ्या बाई आता आर्टऑफ्लिव्हिंगला शिव्या मोजतात. ते लोक जगावर प्रेम करायला शिकवण्याच्या नावाखाली कुटुंब तोडू पहातात अशा निष्कर्षाप्रत त्या आल्या आहेत. आणि आर्टऑफ्लिव्हिंगला जायला लागल्यानंतर कुटुंबात बेबनाव झाले, घटस्फोट झाले याची भरपूर उदाहरणं आहेत असं तिथे जाणारेच सांगतात.
पण असले बाबाबुवा शिक्षणसंस्थांच्या दारातून घुसू पहात असतील तर आपण सावध रहायला हवं. आपण शिक्षणप्रणालीतून जे नाहक स्ट्रेस मुलांवर दडपतो त्यातून सुटण्यासाठी मुलं असल्या आंधळ्या अंधारात शिरत असतील तर त्याचाही विचार करायला हवा. एंजिनिअरिंगचीच काय अनेक प्रोफेशनल कोर्सेसची हुषार मुलं पेपर्स नीट न तपासले जाता लागणाऱ्या निकालाने हैराण असतात.
त्यांना श्री3चं काय कुठल्याही महाराज, बाबा, बापूंचं सोपं उत्तर भुलवत असेल तर विचार आपण करायला हवा.
काही काळ आमच्या कुलगुरू असलेल्या देशमुखबाईंच्या दालनात त्यांची समर्थ महाराजांवरची श्रध्दा मागेपुढे प्रदर्शित होत असायची. त्यांच्या दालनातल्या गम्पती बाप्पाच्या मूर्तीची जास्वंदी आरास झळकत असायची. मग त्यांना भेटायला येणारेही ते सूत्र पकडून बरोब्बर संवाद साधायचे. शैक्षणिक क्षेत्रात स्वतःच्या व्यक्तिगत श्रध्दांचे असे प्रदर्शन कुलगुरूंनी करणे चूक होते. पण ते घडत होते.
अशाच प्रकारे छोटेछोटे संस्थाप्रमुख आपापल्या श्रध्दा प्रदर्शित करू लागले तर सूत्र पकडून लांगुलचालन करणाऱ्यांची कमतरता नाहीच. साऱ्या विद्यार्थांना कुठल्या ना कुठल्या स्ट्रेसमुक्तीच्या श्रध्देच्या मांडवात उभं करण्याचा प्रयत्न होऊ लागेल. आपल्या देशात बिनभांडवलाने चालणारा सर्वात बरकतीचा धंदा श्रध्देच्या मार्केटिंगचा आहे.
हा धंदा साराभाई, सहा, भाभा, खुराना, बोस, सेन, चंद्रशेखर, नारळीकर साऱ्यांना झाकोळून या देशाच्या भवितव्याला ग्रहण लावू शकतो.

Sunday, August 8, 2010
'दाश'बोध
परवा मुंबई विद्यापीठात प्रा. डॉ. बिजॉयकुमार दाश यांचं भाषण आणि प्रेझेन्टेशन झालं. 'टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन इन हायर एज्युकेशन' असा विषय होता. येत्या तीन-चार वर्षांत कॉम्प्युटर्स, प्रोजेक्टर्स अशा साधनांचे जे नवे सोपे, स्वस्त आणि छोटे अवतार येणार आहेत त्यांची त्यांनी ओळख करून दिली. थ्रीडी इमेजेस् सहजगत्या दाखवू शकणारी ही सारी साधने घरोघरी, गावोगावी उत्तमोत्तम शिक्षक पोहोचवू शकतील अशा क्षमतेची आहेत. त्यांनी काही अल्ट्रा कपॅसिटर्स दाखवले. दहा तास उर्जा पुरवठा- म्हणजे वीज पुरवठा करू शकणारे हे कपॅसिटर्स चार्ज करायला फक्त एक मिनिट लागते. वाटाण्याएवढे एलइडी लाइट्स प्रत्येकी चारशे वॅट्स् इतक्या ताकदीने उजेड देऊ शकतील. आपल्या गावोगावचे शिक्षण होण्यातल्या फिझिकल अडचणींवर मात करण्याची क्षमता असलेले हे सारे तंत्रज्ञान आपल्याकडे काही संशोधकांच्या बुध्दीने घेतलेल्या अतीव श्रमांचे फलित म्हणून लवकरच पोहोचणार आहे.
हे सांगता सांगता दाश सरांनी आणखी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले. भाष्य केले म्हणण्यापेक्षा ते सहज निर्मळपणे सांगत होते. पण ते सारे ऐकणाऱ्या मला भाष्य सुचत होते.
विक्रम साराभाईंनी रिसर्चर होण्यापेक्षा इन्व्हेंटर होणे महत्त्वाचे आहे हे मनावर ठसवल्यानंतर कामाला लागलेल्या मूठभर प्रज्ञावंतांपैकी डॉ. दाश एक. ते सांगत होते, साराभाईंनी त्यांना सांगितलं- रिसर्चर हा अखेर चौकटीतल्या चौकटीतच फिरत रहातो. इन्व्हेंटरला चौकटीच्या बाहेरच जाऊन वेगळा मार्ग काढावा लागतो. त्यामुळे तो साऱ्या जगाला काहीतरी नवीन देतो. जगाचं जीवन सुधारतो. दाश आम्हाला सांगत होते- आपणही आपल्या विद्यार्थ्यांना आता हेच सांगितलं पाहिजे. (आपण आपल्या विषयाच्या वर्गात विद्यार्थीसंख्या कशी वाढेल हे पहाण्यासाठी त्यांना आपल्या कालबाह्य विषयाची महती फुगवून सांगू नये)
वेगळा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे-( निदान त्यांना नापास तरी करू नये)
आपल्यातले खरोखरचे उत्तम अध्यापक जे शिकवतात ते रेकॉर्ड करून सर्वदूर पोहोचवले तर शिक्षणाचा सगळा प्रश्न सुटेल (बोंबला! कुणालातरी उत्तम ठरवलं की मग बाकीच्या खोगीरभरतीने काय करायचं गड्या?)
दाश म्हणाले, आपल्याकडे शिक्षण सर्वदूर पोहोचायला पैसा कमी पडतो. या स्वस्त साधनांच्या सहाय्याने आणि जगभरातले उत्तमोत्तम शिक्षक त्यामार्फत विद्यार्थांपर्यंत आणून आपल्याला अगदी कमीत कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देणं शक्य होईल. (आणि शिक्षकाची नोकरी मिळताच आमच्या खाजगी शिकवण्या, आमची शेतीवाडी सांभाळून नोकरी असं सारं झकास चाललंय तेही बोंबलणार की!)
दास म्हणाले आपल्याकडील शासकीय, शैक्षणिक संस्थांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपण लोवेस्ट कोटेशनच्या आधारावर साधने खरेदी करतो. ( लोवेस्ट कोटेशन- हायेस्ट कमिशन असा पूर्ण फंडा आहे साहेब) त्यामुळे आपण अनेकदा ऑब्सोलीट तंत्रज्ञान गळ्यात घेऊन बसतो. ते बदलायला हवं. ( खरेदी समित्यांवर, वित्त निर्णय घेणाऱ्या अनेकांना अद्ययावत् तंत्रज्ञानातील अनेक वस्तू म्हणजे- म्हणजे रे काय
भाऊ असा प्रश्न पडलेला असतो हे कुठे माहीतै आहे तुम्हाला, दाशसर! वीस वर्षांपूर्वी मला पोर्टेबल ओव्हरहेड प्रोजेक्टर हवा होता तेव्हाच्या आमच्या एका साहेबांनी विचारलं होतं- ते कांय असतं? मग दोन वर्षांनंतर मला स्लाइड प्रोजेक्टर हवा होता तेव्हा दुसरे साहेब आले होते ते म्हणाले- पण ते काय जे असेल त्याची खरंच गरज आहे कांय? मग आम्हाला एकदा प्रिंटर-कॉपियर-स्कॅनरची गरज भासली, तेव्हा बजेट कमिटीचे चेअरमन असलेले महोदय-जे नंतर क्रमाने प्रकुलगुरू पुढे कुलगुरू झाले- ते गोंधळून गेले आणि म्हणाले- बघू- पुढल्या वर्षी घेतलं तर नाही चालणार कां?)
मग दाशसर म्हणाले, पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री सर्वांनी मला आपल्या शिक्षणक्षेत्राचा तांत्रिक कायापालट करण्याचं आव्हान दिलं आहे. आम्ही भारतीयांसाठी हा कॉम्प्युटर सध्या पस्तीस डॉलर्समध्ये देता येईल असा केला आहे. मला तो दहा डॉलर्सवर आणायचा आहे. असे स्वस्त तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या हातात असेल. आता त्याद्वारे चांगला कंटेन्ट पोहोचवण्याचे आव्हान तुम्ही स्वीकारायचे आहे.
(बोंबला) कंटेन्टच्या कमिटीवर कोण कोण घुसवायचं- तयारीला लागा मंडळी.
तरीही-
एक असा भारतीय- जो या देशात अनाथ म्हणून रस्त्यावर टाकून दिलेला... दाश दाम्पत्याने वाढवला आणि साराभाईंनी जोपासला... आज नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात प्रोफेसर एमिरेटस आहे. इन्व्हेंटर म्हणून त्याने आजवर करोडो डॉलर्स कमावले आहेत, लक्झुरी जेटचा मालक आहे-सत्तर वर्षाचा आहे. तरीही देशासाठी नवीन काही करू पहातो आहे... तो विद्यापीठात येऊन काहीतरी आत्मीयतेने सांगून गेला.
आशावाद जपून ठेवायला माणसाला एवढं पुरतं.
शिक्षणक्षेत्रातून साऱ्या सुमारपणाचा पराभव व्हायला किती काळ जाईल कोण जाणे...
पण तरीही आशा ठेवायला हरकत नाही

Thursday, August 5, 2010
बावीस वर्षांपूर्वी
बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझंच कॉलेज. एल्फिन्स्टन कॉलेज. सोसयोलॉजीच्या विभागप्रमुख बाईंना विद्यापीठातल्या आमच्या मनोरमा सावुर बाईंनी माझं नाव सुचवलं. त्यांना विभागातली लेक्चरर कन्या परीक्षेच्या ऐन मोसमात रजेवर गेल्यामुळे कुणीतरी महिनाभरासाठी हवं होतं. पेपर तपासायला, सुपरव्हिजन करायला. शिकवण्याखेरीज पडणारी कामं. पण करायलाच लागतात अशी. बाईंनी माझ्याकडे पेपरांचा गठ्ठा सरकवला. अकरावीच्या फाउंडेशन कोर्सच्या मुलांच्या उत्तरपत्रिका होत्या त्या. त्यातल्या अनेक पेपरांत काहीच लिहिलेलं नव्हतं. काहीत जे लिहिलेलं त्याला उणे मार्क्स द्यावेत अशी स्थिती. बाईंनी मधाळ आवाजात सांगितलं. "तसंच असतं गं ते. त्यांना नापास नसतं करायचं. चाळीस-पन्नास टक्के मार्क्स देतोच आपण-"
आपण?!
मग ते कागद पार पाडले. मग आले एस् वाय बीए च्या खुद्द सोसयोलॉजी घेतलेल्या मुलांचे पेपर्स- नव्हे कागद. त्यातल्याही अनेक पेपरांत काहीच लिहिलेलं नव्हतं. काहीत थोडं... काहीत थोडं थोडं... मी पेपर्स तपासत होते. पाचदहा जणांना शून्य... सहासात जणांना सात आठ... पंधरावीस जणांना तीन चार... असेच मार्क्स पडण्यासारखे होते. इतक्यात एक पेपर आला. त्यात काहीही गिरमिटलेलं. अक्षरं जुळवून एक शब्द काही जुळण्यासारखा नव्हता. बाई माझ्याशेजारीच पेपर तपासत बसल्या होत्या. मी वैतागून हसत म्हणाले- "आपल्याला खरंच उणे मार्क्स देता येतात का हो मॅडम? येत असतील तर या पेपरला उणे किती द्यावेत प्रश्न आहे."
त्यांच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. ती कशासंबंधाने होती ते मला अंमळ उशीराच कळलं. त्या तशाच ओढलेल्या चेहऱ्याने म्हणाल्या... "जरा बघू ते पेपर्स... तू तपासलेले सगळेच दे."
मग तो माझा उणे मार्क्सवाला पेपर घेऊन त्या म्हणाल्या... "अगं हा आपल्या -- सरांचा मुलगा... थांब मी बघते. यू डोन्ट वरी. "
त्यांनी माझ्या देखतच त्या पेपरवर तेहत्तीस अधिक दोन टेकवले. मी सुन्न.
मी म्हटलं... "पण मॅडम, मग या न्यायाने या शून्य मार्क्सवाल्यांना सेकंड क्लास, तीन मार्क्स वाल्यांना फर्स्ट क्लास आणि सहा-सात मार्क्सवाल्यांना डिस्टिंक्शन द्यायला लागेल."
त्यांची एक भुवई गगनात गेली आणि त्यांनी माझं प्रबोधन केलं. - "म्हणजे- द्यायचेच. हे मी तपासत असलेले पेपर्स- म्हणजे तपासून झालेले पेपर्स पाहून घे. मी आलेच"-
एकूण सूत्र लक्षात आलंच. त्यांनी परत येऊन हसऱ्या पण कठोर चेहऱ्याने मला सांगून टाकलं.
"अगं, आधीच विषयाला फारशी मुलं येत नाहीत... हॅहॅहॅ..."
सुपरव्हिजनच्या वेळी कॉपी करणारी तगडी मुलं पकडून दिली तेव्हा दुसऱ्या बाईंनी सांगितलं... प्रेमाने सांगितलं... "जरा जपून कराव्या हं अशा गोष्टी."
त्यानंतर ही महिनाभराची बिगार संपली. प्राचार्य घोलकर होते. त्यांनी विचारलं, "मुग्धा, महिन्याभराचा तुझा पगार मी क्लॉक अवर बेसिसवर देऊ शकतो. शासनाकडून तसा पगार यायला वेळच लागेल. तू साधारण किती तास काम केलंस ते लिहून दे बरं."
मी त्यांना सांगितलं ते मनापासून सांगितलं. "सर, कॉलेज माझंच. इथे थोडंस काम केलं त्याचे पैसे घ्यायची काही गरज नाही. मुख्य म्हणजे या महिन्याभराच्या नोकरीतून एक कळलं की मी इथेच नाही तर कुठेही सोसियोलॉजीची शिक्षक म्हणून काम करू शकणार नाही. एवढा धडा मला फार मोलाचा आहे."
मी नंतर कधीही कॉलेजमध्ये शिक्षक व्हायच्या भानगडीत पडले नाही.
पण गेल्या काही वर्षांत सोसियोलॉजीतली परिस्थिती सुधारली आहे कां नाही माहीत नाही.
आणि फाउंडेशन कोर्सचं काय?

Thursday, July 29, 2010
रद्दीनिर्मितीचा कारखाना बंद होणार की काय?
मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंनी परवा पहिलीच विद्वत्-सभेची बैठक भरवली. त्यात अजेंड्याच्या जाडजूड छापील गट्ठ्याकडे निर्देश करीत ते म्हणाले, -हा रद्दी-प्रॉडक्शनचा प्रकार आता थांबवला जाईल. तुम्हा सर्वांना अजेंड्याची प्रत सीडीवर मिळेल. आपापले लॅपटॉप्स घेऊन, बरोबर सीडी घेऊन या. असे कागद वाया घालवणं पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही, नाही कां?- बिचारे कोणीच काही बोलू शकले नाही.
बक अप वेळूकर.
काय गंमत आहे पहा. अमेरिकेत इंटरनेटचा जन्म झाला तो अमेरिकन युनिव्हर्सिटीज् आणि नासा, आर्मी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून. ते सुरू झाल्याला आता दशके लोटली. पण भारतीय विद्यापीठांमधून आयता मिळालेला इंटरनेटचा घास गिळायलाही आम्हाला कष्ट पडत होते. कॉम्प्युटरला हात लावायलाही अजून आपल्या शिक्षक-अध्यापकांना भीती वाटते. मुंबई विद्यापीठाच्या गेल्या सद्दीत तर संगणक-वापराचा आनंदच होता. मुख्य दोघांनाच ते वापरण्याची माहिती नसावी. नाही तर गोष्टी इतक्या कशा रखडू दिल्या असत्या.
एकदा एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याला मी तातडीची अमुक एक गोष्ट इमेलवर पाठवते म्हटलं. तर तो बापडा म्हणाला- नाही म्हणजे हां.. हां.. हां. मी असं करतो... या इथे हे अमके बसले आहेत त्यांना सांगतो त्यांची इमेल द्यायला... माझा प्रॉब्लेम आहे जरा... नाही म्हणजे माझी इमेल आहे... पण माझी मेल इथे उघडता येत नाही.
हसून हसून फुटायची वेळ.
आमच्या या विद्यापीठाने नेट कनेक्टिव्हिटीसाठी किती पैसा दवडला, त्यातला किती कारणी आला- कुणीतरी माहितीच मागवून घ्यायला हवी. अजूनही विद्यापीठाच्या वित्त-लेखा कामांत कॉम्प्युटर फारसा असत नाही. आमच्या पगाराची स्लिप, फॉर्म 16 वगैरे हवं तर प्रत्यक्षच जावं लागतं. क्या बात है!
अहो आमचा प्रत्यक्ष संपर्कावर विश्वास आहे. सर्विस बुक्स, नेमणुकांच्या नोंदी सारं प्रत्यक्ष. स्वतः या नाहीतर प्यून पाठवा.
खेटे घाला संस्कृती टिकवण्याची घोर जबाबदारी आहे विद्यापीठ प्रशासनावर.
वेळूकर सर, बदलणार की काय हे सारं तुम्ही?
बघू या तुम्हाला किती झगडावं लागतं ते...
आपला अडाणीपणा उघड होऊ नये अशी काळजी परोपरीने घेणारे खूप लोक आहेत सर्वत्र.
बदल नको असतो तो तेवढ्याचसाठी.
त्यांच्यापासून सावध रहाण्याचीही तशी गरज नाही म्हणा.
घट्टपणे उभं रहाणारांपासून ते पळ काढतील असा अंदाज आहे.
एक नवीन पाऊल उचललं जात असल्याचा मनापासून आनंद आहे...

Wednesday, July 28, 2010
वाईट शिक्षकांची अडगळ जुनीच.
नेमाडे सरांची हिंदू जगण्याची समृध्द अडगळ वाचायला घेतली आहे. माझ्याच विभागाने चालवलेल्या पुरातत्वाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात मीच या वर्षी दाखल झाले असल्याने वाचायला आणखी मजा येते आहे. खंडेराव- चुकलं- नेमाडे सर स्वतः डेक्कन कॉलेजमधून एम् ए करत होते असं जामखेडकर सरांनी संगितलं.
मग विषय हिंदूवरून डेक्कन कॉलेजच्या जुन्या दिवसांवर सरकला. नेमाडे सरांनी इंग्रजीतून एम्ए केलेलं माहीत होतं. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी लिंग्विस्टिक्समध्ये एम्ए करायला घेतलेलं... जामखेडकर सरांनीही.- आणि मग त्यांच्या सरांनी त्यांची कत्तल केली. सर्वांनाच कमी मार्क्स दिले. हाइयेस्ट मार्क्स म्हणजे दोनशेपैकी सत्तर. पासापुरते. म्हणजे वर्गातला एकच विद्यार्थी पास. बाकी कत्ले आम. सर सांगत राहिले- हे त्यांचे शिक्षक फ्रान्सहून डॉक्टरेट करून आले होते. एका बहुत बड्या फ्रेंच लिंग्विस्टचे विद्यार्थी म्हणून त्यांचा दबदबा होता. तो दबदबाच तेवढा. शिकवण्याच्या नावाने शून्य. ते वर्गात काहीच धड शिकवायचे नाहीत. विद्यार्थी म्हणजे कःपदार्थ. त्यांनी तयार केलेला सिलॅबसही गोंधळाचाच होता. छळ. जामखेडकर सर, नेमाडे सर आता सत्तरी ओलांडलेले. त्यांचा एम्ए चा काळ म्हणजे ते विशीतले असतील. पन्नास वर्षे उलटून गेली. पण...
अजूनही कित्येक विद्वत्तेचा दबदबा असलेले शिक्षक मुलांवर सूड काढल्यासारखे शिकवतातच. आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची कोणतीही पद्धत, त्यांच्याबद्दलचे विद्यार्थ्यांचे मत लक्षात घेऊन त्याला बदलायला भाग पाडण्याचा कोणताही मार्ग अजूनही निघालेला नाही.
असे शिक्षक ज्यांच्या वाटेला येतात ते विद्यार्थी गप्प रहातील, त्यांचे सहशिक्षक नुसते पहात रहातील तोवर हे बदलणारही नाही.

Sunday, July 25, 2010
पीएच् डी संबंधी
लोकसत्तामधून माझा माझे विद्यापीठ हा लेख प्रसिद्ध झाल्यावर जे काही फोन आले त्यातला एक फोन मला अगदी आवडला नव्हता. एका महाविद्यालयातून निवृत्त झालेली ही व्यक्ती मी पीएच् डी संबंधी जे काही लिहिले होते, त्याचा विपर्यस्त अर्थ लावून फारच खूष झाली होती. बाकी सारे मुद्दे बाजूला राहिले आणि एकच सूत्र धरून ते बोलत राहिले. ते म्हणाले पीएच् म्हणजे फालतू आणि डी फॉर डिग्री- पीएच् डी म्हणजे फालतू डिग्री. त्यांनी माझ्या लेखाचे जे कौतुक केले ते मला अजिबात कौतुकास्पद वाटले नाही.
शैक्षणिक क्षेत्रातल्या आपल्याच सहकाऱ्यांनी संशोधनाच्या एका टप्प्याला असे निकाली काढले. आपला आक्षेप असायला हवा तो भरताड डिग्र्या मिळवणाऱ्या किंवा देणाऱ्या लोकांवर. विद्वत्तेच्या क्षेत्रातील एका महत्त्वाच्या टप्प्याचे असे सरसकट अवमूल्यन करणे योग्य नव्हे. असेही आणि तसेही. पगारवाढ, पदोन्नती साठीच केवळ पीएच् डी पदरात पाडून घेणे गैर, सामाजिक-राजकीय वर्तुळात सन्मान मिळवण्यासाठी दुसऱ्यांकडून काम करवून घेऊन, पैसे खर्च करून पीएच् डी मिळवणेही गैर आणि केवळ आपल्याला ती मिळवता आली नाही म्हणून असली फालतू कोटी करणेही गैर.
अनेक लोक आपल्या पीएच् डीच्या संशोधनावर आटोकाट मेहनत घेतात, मान मोडून संशोधन करतात. त्यांचा अधिक्षेप करणारे हे शब्द आहेत.
आजच आमच्या बहिःशाल शिक्षण विभागातील एका तज्ज्ञांनी एक उदाहरण दिले. एका महान् संशोधकाने आपल्या विद्यार्थिनीला वीस वर्षांपूर्वी स्वतः केलेल्या संशोधनाचा बेस घेऊन त्याच विषयावर नव्या संदर्भांच्या चौकटीत पुन्हा संशोधन करण्यास सुचवले. तिच्या संशोधनामुळे त्यांचे निष्कर्ष निकाली निघाले. पूर्णतः रद्दबातल ठरले. या थोर गाईडने त्यावर कृतकृत्यतेची भावना व्यक्त केली. ती विद्यार्थिनी त्यांची बौध्दिक वारस ठरली.
आपल्याकडील अनेक लोक किती कमीत कमी साधने, सुविधा असताना किती कष्ट करून- विशेषतः वैज्ञानिक संशोधनाची कास सोडत नाहीत याचा मला रास्त अभिमान वाटतो.
असे लोक आपल्यात आहेत म्हणूनच भोवती भरपूर उकिरडा असतानाही सारे काही सोडून द्यावे अशी विरक्ती येऊ शकत नाही.

Friday, July 23, 2010
सावध ऐका या आरोळ्या
टाइम्स ऑफ इंडियामध्ये आज टिकेकरांनी कुलपतींना कळकळीची विनंती केलीय. ती आपल्यापैकी बहुतेकांनी वाचलीच आहे.
सध्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया आणि निर्णय हे सद्य राजकीय सत्ताखेळाचे प्रतिबिंब आहे या सत्याचा हा कोळसा उगाळून काही साध्य होईल असे अजिबातच नाही. हे सारे आता बोलणारे-लिहिणारे लोक विद्यापीठाला गेले नऊ महिने कुलगुरू नव्हता तेव्हा काही फारसे बोलल्या, लिहिल्याचे स्मरत नाही.
की विद्यापीठाच्या इतिहास लिहिण्याची पुढली संधी मिळेल तेव्हा या पडीक काळाचा नाट्यमय उपयोग करून घेता येईल असा विचार होता इतिहासकारांचा?
तेव्हा गप्प बसून राहिलेले हे इतिहासकार भाष्यकार आता भाकड विनंत्यांचा गळा काढून स्वतःचे अस्तित्व जाणवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत या पलिकडे मला त्याचा अर्थ लागत नाही. कोळस्कर पूर्वीच्या कुलगुरू निवडीच्या धांदलीत स्वतः होते. नंतर ते स्वतःच शोध समितीचे सदस्य बनले. पण त्यानंतर जर ते त्या पदाच्या शर्यतीत राहिले नसतील तर त्यांना शोध समितीत स्थान मिळाले तर बिघडले कुठे? डॉ. कोळस्कर बुध्दीमान आहेत, विद्वान आहेत यात तर दुमत नाही ना?
काही दिवसांपूर्वीच एकदा टिकेकरांनी टाईम्स ऑफ इंडिया विद्यापीठासंबंधीच एक लेख लिहिला होता. डेथ ऑफ अ युनिव्हर्सिटी- त्यातले मुद्दे योग्यही होते. विद्यापीठ मरते आहे म्हणण्यापेक्षा मी जखमी होते आहे म्हणेन. कारण जखम बरी करता येते. मृत्यू परतवता येत नाही.
आपण सारे या विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत, शिक्षक आहोत... आपण मनावर घेतलं... तर या कडवट मनोवृत्तींना असे मृत्यूलेख लिहिण्याची संधी कदाचित् मिळणार नाही.
निदान म्हणून तरी आपण सारे बोलू, निर्भयपणे जे पटत नाही ते लिहू. विचार मांडणे आणि विचारांनुसार काम करणे हे आपले एकमेव शस्त्र आहे.- जखम साफ करण्याचे, शिवण्याचे.
कुलगुरू कोण झाला कसा झाला याच्या चर्चा चावण्यापेक्षा तो काही काम करतो कां की पोषाखीपणा करतो, मूलगामी बदल करण्याचे धैर्य दाखवतो की उगा वरवरचं काम करून आपली टर्म सुखेनैव संपावी म्हणून दिवस काढतो- या गोष्टींकडे लक्ष ठेवणं आणि त्याच्या हातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं म्हणून वैचारिक धैर्य दाखवून, ताठपणे कामं करणं हे जास्त महत्त्वाचं.
अग्रलेख लिहिण्याची सत्ता हाती असताना सोयीप्रमाणे कुणाला मुका कुणाला दम देण्याचे तंत्र साधलेल्या तथाकथित संपादक-इतिहासकाराच्या विद्यापीठ उद्धाराच्या आरोळीला माझ्या लेखी किंमत नाही.

Thursday, July 22, 2010
भिंती खचू द्या
ब्लॉगच्या एका वाचक मित्राने सुचवलं की नवनवीन शैक्षणिक प्रयोगांबद्दल यात लिहावं. गेली कित्येक वर्षे अनेकदा आपापसात याबद्दल थोडंफार बोलणंही होत आलंय.
एक म्हणजे कॅफेटेरिया शिक्षण संधी. आर्ट्स, शिक्षण, कॉमर्स, विज्ञान, कायदा या शाखांमधील वॉटरटाईट कंपार्टमेंट्स् काढून टाकण्याची गरज.
आपल्या शिक्षणपध्दतीमध्ये अजूनही सहजपणे प्रवाह मिसळू दिले जात नाहीत. विज्ञान म्हणजे सगळे विज्ञानाचेच विषय शिकले पाहिजेत. विद्यार्थ्यांना इतिहासात रस असेल तर त्यांनी काय करायचं- काही उत्तर नाही. कलाशाखेच्या एखाद्या विद्यार्थ्याला जीवशास्त्राची एखादी शाखा खुणावत असेल तर त्याने काय करायचं- काही उत्तर नाही. कॉमर्सच्या विद्यार्थ्याला लेखनाची आवड असेल आणि त्या दृष्टीने त्याला काही शिकावंसं वाटत असेल तर शिक्षणक्रमातून त्याला शून्य मदत होईल. तत्वज्ञानाची आवड तर कुठल्याही शाखेत असू शकते. पण दारे बंद असतात. ज्याला जे हवे ते ते विषय शिकण्याची काही तरी प्रवाही सुविधा आपण कां तयार करू पहात नाही.
1977ची गोष्ट आहे. मी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले होते. पहिल्याच वर्षी, मला तत्वज्ञान विषय घ्यायचा होता. तिथले प्राध्यापक फार व्यासंगी म्हणून ऐकून होते. पण त्यांनी मला सरळच सांगितलं,- माय चाइल्ड, इफ यू हॅफ् बीन टॉट इन् वर्नाक्युलर मिडियम- इट विल बी व्हेरी टफ फॉर यू टु ऍब्सॉर्ब फिलॉसफी... गो फर् समथिंग एल्स, माय चाइल्ड.-
चाइल्ड खट्टू होऊन तिथून निघालं.
तत्वज्ञानाशिवाय तसं तर कोणीच जगू शकत नाही. ऍब्सॉर्ब करण्याचंही कोणी थांबत नाही. पण एक भिंत एका शिक्षकाने नाहकच माझ्या भाषेचं निमित्त करून माझ्यापुढे रचून ठेवली.
हे थोडं विषयांतर झालं, पण आठवलं म्हणून लिहिलं.
आजच्या जगात अभ्यासविषयांच्या मधल्या भिंती झरझर वितळू लागल्या आहेत. विज्ञानाचे ज्ञान कला शाखेच्या विषयांच्या अभ्यासासाठी सर्रास वापरले जाते आहे. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना साहित्य खुणावण्याची उदाहरणे नवीन राहिली नाहीत. कला, विज्ञान, व्यापार आणि कायदा या साऱ्या शाखांच्या अभ्यासाचा मिलाफ असलेला लिओनार्दो दा विंची आपल्याला महान् वाटतो, पण अजून त्याचे हलकेसे प्रतिबिंबही आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या साचलेल्या डोहात पडलेले नाही.
अलिकडेच आमच्या बहिःशाल शिक्षण विभागाच्या आर्किऑलजीच्या वीकेन्ड अभ्यासक्रमात हौसेने आलेला एक कॉमर्सचा विद्यार्थी आर्किऑलजी अधिक शिकण्याच्या ध्यासाने पुरता वेडावला. त्याने सी.ए. करावे ही आईवडिलांची इच्छा मोडून तो डेक्कन कॉलेजला एम्ए आर्किऑलजी करायला जाण्यासाठी सज्ज झाला. पण कट्टरपंथी नियमांची भिंत आड आली आहे. त्याला प्रवेश मिळू शकला नाही. आता आपल्याला इतिहास किंवा प्राचीन इतिहासात तरी एम्ए करता येईल की पुन्हा काही आडवं येईल या भीतीने त्याची झोप उडाली आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलजीचा चांगला डिप्लोमा हातात असलेला हा कॉमर्सचा पदवीधर. त्याला हवे आहे ते शिकता नाही आले तर आयुष्यात एक तर खिन्नविषण्ण तरी होईल किंवा मग काही वर्षे वाया घालवून अखेर हवे तेच करू लागेल. तो खिन्नविषण्ण तर होताच कामा नये. पण त्याची वर्षेही वाया जाऊ नयेत. आपल्या शिक्षणपध्दतीचे कडकडीत सोवळे आता खुंटीवर टांगण्याची वेळ आली आहे.
हा ब्लॉग वाचणाऱ्या सर्व शिक्षणयात्रींनी निदान या विषयावर तरी काही मत मांडावं, मंथन व्हावं अशी माझी विनंती आहे.
Wednesday, July 21, 2010
खांद्यावर काय? पालखी की डोकं?
सारेच चकचकाटी झाले त्याला आषाढी एकादशी तरी कशी अपवाद ठरेल. एवढा मोठ्ठा इव्हेन्ट तर त्याचं कव्हरेज धडाक्यात होणारच. सारं ठीक आहे. आपल्या जगण्याच्या समृध्द अडगळीत हे ही असायचंच, हे आता गृहीतच आहे.
पण वारी, दिंडी नि पालखीचा उत्सव आता महाविद्यालयीन जीवनातही घुसतो आहे. ज्या कोणा तथाकथित संस्कृतीप्रेमळांना यात अभिमानाची बाब वाटते त्यांची आणि त्यांच्या ताब्यातल्या विद्यार्थ्यांची कींव येते.
पण आज एका महाविद्यालयात एका शिक्षकांनी या फुकटचंबू कार्यक्रमाला विरोध दर्शवल्याचे कानावर आले आणि जरा बरे वाटले. दोन तास पालखी नाचवल्यावर सारेजण या शिक्षकांना पालखीत सहभागी होऊन पूजा करण्याचा अत्याग्रह करू लागले, तेव्हा त्यांनी ठामपणे नकार दिला. ज्या गोष्टी मला पटत नाहीत त्यात मी सहभागी होणार नाही असे ठणकावून सांगितले. बराच वेळ दबाव टाकूनही ते बधत नाहीत म्हटल्यावर पालखी निघून गेली. पण मग काही वेळानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य येऊन त्यांना लोकभावनेचा आदर वगैरे भंकस ऐकवून गेले.
हे ऐकत असतानाच ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्राध्यापक आले. जे झाले ते कळताच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या विद्यापीठातच गणपती वगैरे बसवून आरत्या केल्या जातात हा विषय छेडला. आमच्या अनेक शैक्षणिक विभागांतूनही सांस्कृतिक वातावरण निर्मितीसाठी धार्मिक सणवार साजरे केले जातात. अनेक विभाग प्रमुख त्याला सक्रिय पाठिंबा देत असतात. विद्यार्थ्यांचे आपसातले मैत्र वाढावे, त्यांना एन्जॉय करता यावे म्हणून कितीतरी नावीन्यपूर्ण घटना साजऱ्या करता येतील. ठरीव सण, ठराविक दिवस साजरे करण्यापेक्षा आपण विद्यार्थ्यांना काही वेगळे अर्थपूर्ण पर्याय देऊ शकतो. आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती म्हणून धर्म-संप्रदायांचे कार्यक्रम, सणवार साजरे करणे नाकारणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे याचेही भान जागे रहायला हवे.
वारी असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो- समाजात हे सारे साजरे होतच आहे. त्यांचे संदर्भ अर्थ हरवत चालले असले तरीही गतानुगतिकतेपोटी ते चालूच रहाणार आहेत. त्या सर्वासाठी वेळ आणि ऊर्जा खर्ची घालून त्यांचे जतन करायला हवे अशी काही वेळ ओढवलेली नाही... सारे पर्याय बाजूला सारून तेवढेच साजरे करण्यासाठी विद्याक्षेत्रातही वेळ घालवायची मुळीच गरज नाही. असल्या बौध्दिक दिवाळखोरीचे प्रदर्शन जिथे मांडले जात असेल तिथे आपण त्याला विरोध तर केला पाहिजेच पण
सुजाण पर्यायही सुचवले पाहिजेत.
आपल्या देशाच्या संस्कृतीची कित्येक शतके, कित्येक वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भविश्वात कुठे शिरलेलीच नाहीत. बहुसंख्य समाजाच्या मर्यादित संदर्भांच्या खुराड्यांतून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या खांद्यावर पालख्या देण्याचे नव्हे तर खांद्यावरच्या डोक्यांची जाणीव देण्याचे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत.
पण त्यासाठी मुळात आपली डोकीच वापरायला हवीत!
लोकभावनेचा आदर करण्याच्या पोलिटिकली करेक्ट नादात तेच तर विसरायला होतं ना!
गोची तिथेच तर आहे आपली!

Tuesday, July 20, 2010
प्रवेशद्वार
आमच्या विद्यापीठाच्या विद्यानगरी कॅम्पसच्या बाहेर प्रचंड मोठे बॅनर्स लागलेले असतात. ना. राणे, डॉ.राणे, राजसाहेब, कृपाशंकरजी, मा.ना. शरद्चंद्रजी, उद्धवसाहेब यांच्या नावांनी सजलेले दहादहाफूट लांबरूंद फलक दाराशीच असतात. विद्यापीठाचे नाव लिहिलेली झुरताड पाटी त्यात तोंड तपवत उभी आहे जेमतेम.
ग्रँड हॅयातच्या समोर एक प्रवेशद्वार करून ठेवलंय. खोले-सावंत द्वयीच्या काळात अडीच वर्षे त्याचं काम चाललं होतं. कुठल्या वशिल्याच्या तट्टू डिझायनरने त्याचं डिझाईन केलंय माहीत नाही आणि माहीत करून घ्यायची इच्छाही नाही. पण हे गचाळ प्रवेशद्वार पाहिल्यानंतर या विद्यापीठाच्या या प्रशासकांनी कधीकाळी कुठलं दर्जेदार विद्यापीठ पाहिलंच नसावं अशी शंका येते. पण तेही खरं नाही- सगळे कुलगुरू तसे भरपूर जग फिरून येतात हे आपल्याला माहीत आहे. आपणही सारे अनेक विदेशी विद्यापीठांत पिरून आलेलो असतोच.
या प्रवेशद्वारापाशी बाहेरचा रस्त्याचा भाग आहे तो अजूनही धड झालेला नाही. आणि आत शिरताना विद्यापीठाचे नावही नाही. साईनाथ दुर्गे यांच्या नावाचा फलक सिमेंटच्या ठोकळ्यांवर लागलेला तेवढा दिसतो.
आपल्यापैकी कुणालातरी विद्यापीठाच्या या दर्शनाबद्दल तीव्रतेने वाईट वाटलं कां कधी? वाटलं असेल तर... नक्कीच वाटलं असेल. पण बोलतो कोण... आपण कशाला वाईट व्हा? आपलं काम नाही ते! आपण ठरवून घेतलंय. आपण आपली चौकट मोडायची नाही. जब जब सिर उठाया एपनी चौखट से टकराया. कवीने आपल्याला प्रेरणा देण्यासाठी थोडच लिहिलं? ते तर आपण माना कायम वाकवून ठेवाव्यात म्हणून सांगून ठेवलं बिचाऱ्याने !
विद्यापीठाच्या दारात काही चांगलं नाही उभारू शकलो आपण- आपण पडलो थर्ड वर्ल्ड. आपल्याकडे फंड्स्ची बोंब. नाही उभ्या करू शकलो संगमरवरी कमानी. एखाद्या प्रख्यात भारतीय शिल्पकाराचे ग्रेनाइट किंवा ब्रॉंझचे शिल्प विकत घेऊन मांडण्याची आर्थिक ताकद नाही आपली. आपल्या फोर्ट कॅम्पसच्या दारावरची नावाची कमान रेल्वे यार्डाच्या कर्षण उपकेंद्राची असते अगदी तश्शीच सुंदर निळ्या रंगात रंगवलेल्या पत्र्याची आहे.
ठीक आहे... पण निदान फुटकळ राजकारणी हेतूंनी रंगवलेल्या फ्लेक्सचे बटबटीत फलक तिथे टांगले जाऊ नयेत एवढीही आपली इच्छाशक्ती नसावी?
लाज वाटायलाच हवी आपल्याला.
Monday, July 19, 2010
फडतूस विद्वानांचे राजकारण
विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतून फालतू पॉलिटिक्स होते यात काही नवीन नाही. सिनिऑरिटी वगैरेसारखे मुद्दे म्हणजे तर रोजचीच लढाई. हे पॉलिटिक्स विद्यार्थ्यांची विषयाची निवड किंवा शिकण्याची संधी इथवरही जाऊन पोहोचते तेव्हा ते हाणून पाडायलाच पाहिजे. आज माझ्या संपर्कातील कित्येक कॉलेजांमधले शिक्षक काय काय कथा आणि व्यथा सांगत असतात, त्या ऐकल्या की अंगावर शहारे उठतात. आपण राजकारण्यांना किती हिरीरीने नावं ठेवतो, किती रेवडी उडवतो. ते तर थेट राजकारणातच असतात. आपल्या विद्याक्षेत्रातले, ज्ञानक्षेत्रातले काही लोक आपसात किंवा विद्यार्थ्यांशी किती राजकारण करतात ते पाहिलं, अऩुभवलं की घृणा येते.
मराठीचे एक जुने प्राध्यापक होते- ते विद्यार्थ्याला वर्गाबाहेर भेटले की समोर तीन पुस्तकं धरायचे आणि म्हणायचे- बघ, तुला हवं ते घे यातलं. वाच. आणि मग आपण बोलू या हं त्यावर.
आपल्या विद्यार्थ्यांना वाचनाचं वळण त्यांनी लावलं ते कायमचं. या विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांवर त्यांच्या सहकारी बाई जळफळत रहायच्या. पण आपणही तसं काहीतरी करावं अशी उर्मी काही त्यांना झाली नाही. आज त्यांच्या भाषाविभागात विद्यार्थ्यांची प्रचंड वानवा आहे. पण त्यासाठी काही चांगला दृष्टिकोन घेऊन नवीन प्रयोग करणे त्यांना जमणार नाही. ज्या विभागांकडे विद्यार्थी आहेत त्यांचा दुस्वास करण्यापलिकडे त्या जाऊ शकत नाहीत. उद्या कुठल्या परिषदेत भाषेच्या रक्षणाच्या नावाने गळा काढणारे भाषण फारफार तर करताना दिसतील त्या. आपल्या विभागात येणारे नवीन शिक्षक विद्यार्थीप्रिय होताना दिसले तर त्यांना त्रास कसा द्यावा यावर आपल्याकडे पदविका सुरू केली तर आपल्याला खूपच फॅकल्टी मिळेल.
विद्यापीठातल्या एका भाषा विभागातली गोष्ट आहे. व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करणारा, शिकवण्यावर प्रेम असणारा एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होता. प्राध्यापक होऊ शकेल अशी त्याची गुणवत्ता होती. इतके त्याचे शोधनिबंध होते. अनेक विदेशी विद्यापीठांतून व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून त्याला निमंत्रणे येत.
परीक्षेसाठी पेपर काढणे, ते तपासणे, आपल्याला सुट्टी हवी असेल तेव्हा त्याच्याकडे आपली लेक्चर्स सरकवणे यासाठी इतर सर्व शिक्षकांना तो फार हवाहवासा होता. पण जेव्हा नियुक्तीची वेळ आली, तेव्हा विभागतल्या भयग्रस्तांच्या थव्याने त्याला रीडर म्हणून नियुक्ती मिळू नये याची काळजी घेतली. तेव्हाच्या कुलगुरूंनी आपल्या महाराष्ट्राच्या ऑलपावरफुल साहेबांच्या नावाने चिठ्ठी फाडून त्याचा पत्ता कापला. आज तो शिक्षक कच्छ विद्यापीठात विभागप्रमुख आणि प्राध्यापक म्हणून रुजू झाला आहे. आणि कदाचित एका विदेशी विद्यापीठात कायमचा जाण्याची शक्यता आहे. फडतूस हितसंबंध जपण्याच्या
अंतर्गत राजकारणामुळे या विद्यापीठातील विद्यार्थी एका अत्युत्तम शिक्षकाला कायमचे मुकले.
नको त्या अशैक्षणिक मापदंडांच्या आधारावर विद्याक्षेत्रात घुसलेल्या पोटार्थींनी आपली प्रतिष्ठा वाढवण्याच्या असल्या निरर्थक खेळ्या करणे थांबवले तरी काही प्रमाणात आपण सावरू शकू.

Sunday, July 18, 2010
गंमत
आजच्या फाउंडेशन दिनी नव्या कुलगुरूंनी विद्यानगरीत वृक्षारोपण केले. ही तर सर्वमान्य प्रथा आहे. यात कसली गंमत... त्यांनी अ.दा.सावंतांनी स्थापन केलेल्या गुलाबपुष्प उद्यानात नवीन गुलाबाची रोपे लावली- क्या अदा है!
माझा ब्लॉग वाचलेले एक वात्रट मित्र कुजबुजले- हे म्हणजे त्यांना आपल्या थडग्यावरच गुलाब वाहिल्यासारखं वाटेल नाही?!
क्या अदावत है!
मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी कॅम्पसमध्ये नाल्याच्या काठाने एक वनस्पती उद्यान व्हावे अशी कल्पना बावीस वर्षांपूर्वी डॉ. एस्, एम्. करमरकर या वनस्पतीशास्त्राच्या ज्येष्ठ प्राध्यापकांनी मांडली होती. ती अडगळीत गेली. मग 1998 साली मी आणि डॉ. शरद चाफेकर, डॉ. लट्टू अशा तिघांनी मिळून पुन्हा एकदा ती व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यावेळच्या कुलगुरूंनी- कोण आहे रे तिकडे- नकाशा कुठेय, कुठे आहे नकाशा- कुठे आहेत ते एंजिनिअर- असा जोरदार आरडाओरडा सुरू केला आणि ते तिथेच संपलं. 2000 साली आलेल्या तथागतांनी विषय काढताच- व्हेन आय वॉज इन कुआलाsssलंपूर असा सूर लावून विषय आपल्याला कळतच नसल्याचं पुरेसं स्पष्ट केलं आणि ते तिथंच संपलं. 2004 साली शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने या कल्पनेला बरे दिवस येतील अशा आशेने मी पुन्हा एकदा कुलगुरूंकडे विषय काढला. प्रकुलगुरूंना त्यातले जास्त कळते म्हणून त्यांनी तो प्रकुलगुरूंकडे सोपवला. पण कमिटी माझ्या सूचनांनुसार स्थापन झाली. नको इतकी बकबक करून विषयाला फाटे फोडणारे काही लोक मी हेतूपूर्वक वगळले होते. नाहीतर असल्या कमिट्यांत बकवास जास्त आणि काम कमी होते हा विद्यापीठाच्या इतिहासाचाच भाग आहे. पण प्रकुलगुरूंनी आपल्या अध्यक्षतेखाली बैठका सुरू केल्यानंतर त्यांना मागील दारातून आत घेतले. मग व्हायचे तेच झाले. अहो सगळा कॅम्पसच एक बोटॅनिकल गार्डन करू ना आपण असला फालतू बाजा वाजू लागला. तीन बैठकांनंतर बोटॅनिकल गार्डनसाठी बैठका बोलावण्याचं बंदच झालं. केंद्र शासनाकडून संपूर्ण आर्थिक सहकार्य मिळणं शक्य असतानाही, चांगले तज्ज्ञ काम करण्यासाठी उपलब्ध असतानाही या कल्पनेचा बोऱ्या वाजवण्यात आला.
त्या ऐवजी प्रकुलगुरूंनी गुलाबाचे उद्यान करवून घेतले. त्यात काही वाईट झाले असे नाही. पण त्यांनी बोटॅनिकल गार्डनच्या निर्मितीची कल्पना किती ठेंगणी केली, ते विसरता येत नाही. आणि त्यामागचा अजेंडा लक्षात घेता, आज तिथे नव्या कुलगुरूंना रोप लावताना पाहून चांगलीच गंमत वाटली.
कुणा गंध कुणा काटे.

Saturday, July 17, 2010
फाउंडेशन डेची खूणगाठ
उद्या 18 जुलै. विद्यापीठाचा संस्थापना दिन. चक्क रविवार असूनही रविवारीच साजरा होतो आहे, हे विशेष. यापूर्वी अनेकदा कधी सुटीच्या दिवशी आला म्हणून कधी सणाच्या दिवशी आला म्हणून कधी कुलगुरूंना जमत नाहीए म्हणून अनेकदा संस्थापना दिन पुढे ढकलून साजरा करण्यात आला होता.
आमच्या विद्यापीठात ही एक गंमत आहे. आणि सारेच ती चालवून घेतात. सोयिस्कर. म्हणजे उदाहरणार्थ गणपती, दसरा, शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा साऱ्या साजऱ्या करण्यासारख्या दिवसांच्या बाबतीत हे अवश्यच होतं. होतं काय... हे सारे दिवस असतात सुट्टीचे दिवस. हक्काची सुट्टी- ती तर उपभोगायलाच हवी, शिवाय धार्मिक सणांच्या बाबतीत घरचं कार्य असतंच. मग लोक काय करतात- गणपतीची पूजा आदल्या दिवशी, दसरा आदल्या दिवशी, शिवजयंती, आंबेडकर जयंती नेमक्या दिवसाच्या पुढल्या आठवड्यात कामाच्या दिवशी कधीही ऑफिसमध्ये साजरा होतो. म्हणजे सुट्टीचाही फायदा मिळतो आणि कार्यालय चालू असतानाही सुट्टीसारखे वातावरण तयार करून मज्जाच मज्जा करता येते. या सणावारांशिवाय कामाच्या दिवशी-बहुतेकदा पहिल्या, तिसऱ्या किंवा पाचव्या शनिवारी सत्यनारायणाची 'म्हापूजा' असतेच कधीमधी. नवरात्रात आपापल्या सेक्शनमध्ये आरास करून आरत्या-बिरत्या करूनही लोक भरपूर धमाल करतात. बरं यात धार्मिक भावनांचा अति बलदंड नाजूक प्रश्न असल्यामुळे कोणतेही,कोणाच्याही नेतृत्वाखालचे प्रशासन कार्यालयीन वेळेच्या या सरळ सरळ अपव्ययाला आळा घालू धजत नाही.
बुध्दीवंत,बुध्दीजीवी म्हणवणारे आपण बोटचेपे लोकही या फंदात आजवर कधीही पडलेलो नाही. कार्यसंस्कृतीची ओळखही नाही आपल्या विद्यापीठात, असे अनेकांना वाटते, हे माहीत आहे. पण सारे कसे गपगार रहातात.
असं कां होतं? आपली बुध्दीवंतांची चांगल्या नोकऱ्या, मान-सन्मान लाभलेली जमात असले परिवर्तन करण्याच्या भानगडीतच पडत नाही.
काय हेतू असतात आपले? कसली भीती असते नेमकी?
आपल्याला कुणाला दुखवायचं नसतं. कशाच्या विरोधात बोललं तर आपल्याला प्रशासकीय सहकार्य मिळणार नाही. आपल्या रजा, विशेष रजा, सर्विस बुकची कामं, आर्थिक बाजू असलेली कामं अडतील, लांबतील किंवा होणार नाहीत, आपल्याला त्रास होईल... असल्या फुटकळ कामांच्या भीतीमुळे आपण आपल्या वैचारिक जबाबदाऱ्या नाकारतो असं मला वाटतं. सर्वांशी मधुर संबंध असले तर आपली कामं होतील हा एक आपला लाडका गैरसमज आहे. प्रशासकीय उतरंडीत कसले तरी नकाराधिकार ताब्यात असलेल्या सुमार (mediocre) वरच्या-खालच्या सर्वांनाच काय केलं म्हणजे हे बुध्दीवंत झुकतात हे आता चांगलंच कळलंय. आपण ते नाकारलं पाहिजे. कुणालाही माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून मूलभूत चांगली वागणूक देणं आपण विसरता कामा नये, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की स्वहस्ते आपल्या नाकात वेसण घालून आपण त्यांच्या हातात द्यावी.
एक उदाहरण- कुठेही परदेशी जाण्याची संधी आपल्या शिक्षकांना आली की त्यांना खेळवलं जातं. फालतू कारणं देऊन अडवणूक केली जाते. ग्रांट मोकळी होण्यात अडतळे आणले जातात. आपल्यापैकी अनेक बुध्दीवंत काय करतात... असे अडथळे आणणाऱ्यासाठी परतल्यानंतर फॉरेनच्या चॉकलेट्सचा किंवा परफ्यूमचा नजराणा देतात- जेणेकरून पुढल्यावेळी असा त्रास होऊ नये.
यात प्रेम- किंवा आपुलकीपेक्षा तुष्टीकरणाचाच भाग असतो.
आपलं काम नाही झालं- परदेशी जायला नाही मिळालं तरी चालेल पण असल्या फालतू कारणांपुढे गुडघे टेकणार नाही, नांगी टाकणार नाही असा बाणा आपण कां नाही दाखवत? दाखवायला हवा. पण हे सुध्दा तेव्हाच शक्य आहे की आपली वर्तणूक, वैचारिक-बौध्दिक चारित्र्य स्वच्छ असेल. तू आम्हाला बोलाव आम्ही तुला बोलवतो असल्या देवघेवीवर आधारित निमंत्रणे मिळवणाऱ्यांना हे जमणार नाही.
आणि हाच नियम सर्वत्र लागू होतो. कार्यालयीन रेड टेपीझमवर मात करण्यासाठी आपल्या स्वच्छ बुध्दीने दाखवलेल्या खंबीरपणाचे शस्त्रच कामी येईल.
या फाउंडेशन डे निमित्ताने ही माझी खूणगाठ.
Friday, July 16, 2010
प्रतिक्रियांचा आडवा छेद
हा लेख प्रसिद्ध झाल्यावर प्रतिक्रिया आल्या त्यांवरून आपल्या बुध्दीवंतांच्या जमातीचा पोत लक्षात येतो. प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या सर्वांना लेखातले जवळ जवळ सगळेच मुद्दे पटले होते. आणि बहुतेकांनीच मी दाखवलेल्या धैर्याबद्दल कौतुक व्यक्त केलं. बरं वाटलं आणि वाईटही. जे सत्य आहे ते लिहायला निदान बुध्दीजीवी, बुध्दीवंत म्हणवून घेणाऱ्यांना तरी फार काही आगळ्या वेगळ्या धैर्याची गरज पडयला नको. ते आपलं कामच आहे.
आज आपली अशी झुकी झुकीसी अवस्था कां झाली आहे- याला अनेक कारणं असली तरी मुख्य कारण आपण ओज गमावून बसलो आहोत- हे आहे. आपण धैर्य दाखवणं म्हणजे काहीतरी विशेष आहे हे मानताच कामा नये. धैर्य न दाखवणे म्हणजेच भीती बाळगणे.

आपल्या भीतीचे पदर तरी किती असावेत. पहाणं मोठं आवश्यक आहे. त्यात किती वैविध्य आहे. आपण कशालाही घाबरत असतो, कशासमोरही झुकत असतो. त्यातून आपण आपला उरला सुरला आत्मा गहाण टाकत रहातो आणि मग हताशपणे म्हणतो- आपण तरी काय करणार... व्यवस्थाच अशी आहे.
या वाक्याचा आधार घेणं थांबवून जरा आपल्या झुकण्याचे प्रकार आणि भीतीची उठवळ कारणं, कातडीबचाऊपणाचे दाखले जरा विस्तृतपणे लिहिणार आहे. उदाहरणं खरी असतील. व्यक्तिगत असतील. पण त्यांची नावं लिहिण्याचं प्रयोजन नाही. कारण आपणापैकी प्रत्येकाला त्यातून स्वतःवर हसता हसता पुढे जायचं आहे.
रोज एकेक उदाहरण लिहिणार म्हणतेय. तुम्हालाही लिहावंसं वाटलं तर लिहायचंय. किंवा कळवायचंय.
Thursday, July 15, 2010
माझे विद्यापीठ- सुरुवात लोकसत्तातून
माजी प्रकुलगुरूंची आजी कुलगुरूंच्या नियुक्तीसंदर्भातील वक्तव्य एक निमित्त ठरलं. विद्यापीठातील गोंधळाबद्दलचा राग मनात होताच. त्याबद्दलचा लेख लोकसत्ताच्या मंगळवार, दि. 13 जुलै2010च्या अंकात छापून आला. त्यानंतरच्या अनेक अभिनंदनपर प्रतिक्रियांनंतर एक ब्लॉगच सुरू करावा असे वाटले. लोकसत्तात छापलेल्या लेखात थोडी काटछाट झाली आहे. म्हणून ब्लॉगचं पहिलं पोस्ट मूळ लेखच टाकायचं ठरवलं.
असं मोकळेपणाने, निर्भयपणे लिहायला हवं असं मत अनेकांनी व्यक्त केलंय. त्या जातकुळीच्या सर्वांनी यात सहभागी व्हावं हे आवाहन.
माझे विद्यापीठ
मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू आणि सध्याचे राजस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीबाबत जी काही वक्तव्ये चालवली आहेत ती वृत्तपत्रांतून वाचायला मिळाली. मनोरंजन झाले. मनोरंजन झाले की साधारणपणे आनंद वाटतो- पण आजकाल काही वेळा असे मनोरंजन होते की त्यामुळे खिन्नताच अधिक येते.
सत्ताधारी पक्षांतल्या, विरोधी पक्षांतल्या प्रखर राजकारण्यांशी ओळखी वाढवून कुठल्याही पदापर्यंत पोहोचता येते हा धडा डॉ. अ. दा. सावंतांना काही नवा नाही. पण आपली निवड न होता दुसऱ्याची झाली की मगच पारदर्शकतेची आठवण यावी... स्वाभाविक आहे!
राजस्थानच्या कुलगुरूंनी आपण नव्या कुलगुरूंपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ आहोत असे म्हणताना ‘इम्मॉडेस्टी’चा दोष पत्करून आपण असे म्हणतो अशी पुस्तीही जोडली आहे. (इम्म़ॉडेस्टीचा दोष पत्करून याचे मराठी भाषांतर आत्मश्लाघेचा दोष पत्करून असेही होऊ शकते किंवा लाज गुंडाळून असेही होऊ शकते). वेळूकरांनी कोणत्याही पी.एच्.डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले नाही हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आपल्या मार्गदर्शनार्थ असेल्या विद्यार्थी संखेपेक्षा त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे हा एकच निकष कुलगुरूपदासाठी श्रेष्ठत्व ठरवण्याचा असू शकत नाही हे शोधसमितीला कळले हे बरे झाले.
विद्यापीठाच्या कामाचे, रिझल्ट्स्चे, एकंदर कार्यक्षमतेचे, पदव्यांच्या दर्जाचे धिंडवडे निघत असताना कुलगुरू पदावरील व्यक्तींनी किती पी.एच्.डी धारकांना गाईड केले (काढले?) यापेक्षा इतर अनेक गुण महत्त्वाचे ठरू शकतील. अर्थात ते सर्व गुण विद्यमान कुलगुरू डॉ. वेळूकरांच्यात आहेत की नाहीत हे सिध्द व्हायचे आहेत. पण मागल्या कुलगुरूंच्या कारकीर्दीत कुलगुरू आणि प्रकुलगुरू दोघांचाही वकूब सुमार होता हे पुरेसे सिद्ध झालेले आहे.
डॉ. अ. दा. सावंत हे त्यांच्या कामापेक्षा यांच्या प्रदीर्घ भाषणांसाठी जास्त प्रसिद्ध होते. त्यांना प्रकुलगुरू या नात्याने बोलवल्यानंतर ते बोलू लागले की महाविद्यालयांतील आणि विद्यापीठांतील श्रोते अक्षरशः जेरीस यायचे. ‘कमीत कमी चाळीस मिनिटे’ अशी त्यांची ख्यातीच झाली होती.
काही कामे अर्थातच तत्कालीन कुलगुरू-प्रकुलगुरू जोडीने केली. हे म्हणायला पाहिजे नाहीतर माजी प्रकुलगुरू आपण केलेल्या कामांची यादी ऐकवायला सुरुवात करायचे- की गेली चाळीस मिनिटे. तशी बरीच कामे करणे त्या पदावरच्या व्यक्तींना भाग असते. पण एखादे काम झाले नाही की प्रकुलगुरू डॉ. अ. दा. सावंत आपल्या दरबारात या गोष्टीला कुलगुरू आणि कुलगुरूच कसे जबाबदार आहेत हे फुलवून फुलवून सांगत.
आपली टर्म संपता संपता डॉ. अ. दा. सावंत, प्रकुलगुरू मुंबई विद्यापीठ, अध्यक्ष, बॉम्बे रोझ सोसायटी, यांनी आपल्या कारकीर्दीत विद्यानगरीमध्ये विद्यापीठाशी तसा संबंध नसलेले गुलाबाचे उद्यान करवून घेतले. गुलाबाचे प्रदर्शन राजभवनात घेऊन दरबारी ओळख सुवासिक केली... पण हाय रे दैवा... राज्यपाल बदलले आणि सारी गुलाबी फील्डिंग वाया गेली.
खरे तर एका राज्याच्या विद्यापीठात कुलगुरू असणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या राज्याच्या राज्यपाल कचेरीच्या पारदर्शकतेबद्दल अशी बडबड केली तर ती राजशिष्टाचाराला धरून आहे कां याची शहानिशा व्हायला हवी.
पण डॉ. अ. दा. सावंत “काय बहु बडबडले” हा मुद्दा खरेतर तसा फार महत्त्वाचा नाहीच. पण कोणी शिरजोर होऊन बोलावं- त्याला काही मर्यादा असावी.
गेले नऊ महिने मुंबई विद्यापीठाचा कारभार पार्टटाइम कुलगुरूंनी सांभाळला. यात त्या व्यक्तीचा तसा दोष नाही. आजवर कुलगुरू नसलेल्या काळात विद्यापीठातील सर्वात ज्येष्ठ प्राध्यापकांकडे चार्ज देण्याची पध्दत होती. या वेळी अपवाद करून दुसऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पदभार देण्यात आला. त्यानंतर जे झाले ते अपेक्षितच होते. आताच्या नियुक्तीबद्दल बौध्दिक पातळीवर आव्हाने देणारे सारे ज्येष्ठ प्राध्यापक तेव्हापासून गप्प बसले याचे कारण काय असू शकेल बरे? आपल्यातल्याच संभाव्य प्रतिस्पर्ध्याच्या हाती काही काळासाठी सत्ता जाण्यापेक्षा हे बरे वाटले होते? ओंडका राजा बरा!
विद्यापीठातल्या सर्वच बुध्दीवंत म्हणवणाऱ्या प्राध्यापक-अध्यापकांकडे आजच्या दुरवस्थेचा दोष जातो. आम्ही सारे कमिट्यांच्या मानमरातबांच्या किरकोळ राजकारणात इतके गुंग होतो की हास्यास्पद ठरतो. बोर्ड ऑफ स्टडीज् असो, संशोधनांसंबंधीच्या समित्या असोत, चौकशी समित्या असोत या सर्व ठिकाणी दुसऱ्या गटाच्या अमक्या तमक्याची जिरवायची हा अंतःप्रवाह खळखळाट करीत असतो. अनेक कार्यक्रम पार पडतात ते मार्चपर्यंतचा अनुदानांचा किंवा बजेटचा शिधा संपवण्यासाठी. अनेक योग्य व्यक्तींना नियुक्त्या मिळत नाहीत कारण कदाचित त्या आल्या तर आपले पितळ उघडे पडेल म्हणून.
व्यक्तीचा व्यासंग, क्षमता न पहाता त्याच्यावर लागलेले शिक्केच फक्त इथे तपासले जातात. सध्याच्या किडलेल्या विद्व्यवस्थेत दर्जा, गुणवत्ता वादातीत आहे अशी परिस्थिती ग्रॅज्युएशनची नाही, पोस्ट-ग्रॅज्युएशनची नाही आणि पी.एच्.डीच्या पदवीची तर नाहीच नाही. शिक्षणक्षेत्रात नोकरी मिळवायची तर ग्रॅज्युएशनला-पोस्ट ग्रॅज्युएशनला फर्स्टक्लास किंवा हायर सेकंड क्लास लागतो. मग शिक्षकांच्या हाती विद्यार्थ्याच्या नाकातली वेसण येते. त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांपेक्षा माझ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळावेत या प्रयत्नांऐवजी त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स किंवा नापासच करायचा प्रयत्न पेपर्स तपासणारे बरेच शिक्षक करतात- या घटना कळत रहातात. दगडांखाली हात सापडलेले कणाहीन विद्यार्थी आणि अनेकदा कणाहीन शिक्षकही या गोष्टींबद्दल आवाज उठवत नाहीत. इन्क्रिमेंट मिळते म्हणून संशोधनाचीच काय तर्कशुध्द विचारही करायचीही कुवत नसलेले अनेक लोक ‘योग्य’ गाईडच्या शोधात असतात. गाईड देतील तो विषय घेऊन फटाफट प्रबंध कसा लिहायला जमतो यांना- कोणी विचारत नाही. आपल्याकडील पी.एच्. डी संशोधन हा बहुतांशी पगारवाढीचा, नोकरी पक्की करण्याचा टप्पा ठरतो आहे. गांभीर्याने संशोधन करू इच्छिणाऱ्या अनेकांची मने या प्रकारामुळे विदीर्ण होतात. पण विद्यापीठातले दुकान असे बंद होऊन थोडेच चालेल? आता तर कुलगुरू होण्यासाठी जास्तीत जास्त पी.एच्. डी काढण्याचा नवा फंडा सावंत साहेबांनी दिला आहे.
तुम्ही माझ्या विद्यार्थ्याचे एक्स्टर्नल रेफरी- मी तुमच्या अशी मिलीभगत जागोजाग होऊन आपल्या विद्यापीठांतून कितीतरी संशोधन होते, कितीतरी डॉक्टरेट्स होतात. यातल्या अनेकांना इतर संबंधित विषयांसंबंधी सोडा, आपल्या विषयासंबंधी चार वाक्ये स्वतंत्रपणे लिहिता येतील कां ते तपासायलाच हवे. तरीही पी.एच्. डी संशोधनाची लयलूट आहे.
इंटरनॅशनल अलायन्स फॉर रिसर्च युनिवर्सिटीज् या 2006 साली स्थापन झालेल्या शिखर संस्थेत जगातील केवळ दहा नामवंत विद्यापीठे आहेत. त्यात भारतातील एकही नाही. खरे म्हणजे त्यांनी पायघड्या घालून आपल्याला बोलवायला हवे. कां बरं बोलवत नाहीत? बहुधा त्यांच्याही निवड प्रक्रियेत पारदर्शकता नसावी झालं!
विद्यापीठाच्या परिस्थितीची रड सांगायची तर आमच्या कॅम्पसमधल्या इमारतींची दुर्दशा सांगितल्याशिवाय कथा पुरी होतच नाही.
डॉ. खोले आणि डॉ. अ. दा. सावंतांच्या कार्यकालात या विद्यापीठाने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा केला. या काळातही विद्यानगरी कॅम्पसमधल्या इमारतींची कळा सुधारली नाही. फोर्ट कॅम्पसमधील कुलगुरूंच्या विंगचे, दीक्षान्त सभागृहाचे नूतनीकरण आभा लांबा या प्रज्ञावंत हेरिटेज आर्किटेक्टमुळे अतिशय उत्कृष्ट झाले. बाकीची इमारत तशीच वास मारणाऱ्या मुताऱ्यांसकट दिवस ढकलते आहे.
विद्यानगरी कॅम्पस तर झोपडपट्टीचं कोंदण लाभलेली जरा वरच्या स्तरातली आणखी एक ढासळती वस्ती. काही नव्या इमारती सोडल्या तर बाकीच्यांचे रंग इतके उडालेले की पहावत नाहीत. अगदी मुख्य प्रशासकीय कार्यालय असलेली आंबेडकर भवनाची इमारत- वाईट डिझाइन तर आहेच पण निदान वेळोवेळी रंगसफेदी करून लाज राखावी असेही कुणाला वाटले नव्हते. आपापली दालने एसी, सोफा मंडित असली की वरिष्ठांचे काम होते. मेन्टेनन्सची कामे करणारे सर्व कर्मचारी प्राधान्याने हीच कामे करतात हे ओघानेच आले. इतरत्र आनंदी आनंद.
कुलगुरू-प्रकुलगुरूंना असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसेल हे ठीक आहे- पण मुख्यतः अभाव आहे तो दृष्टीचा. सेनेटचे एक सदस्य दीपक मुकादम मला एकदा म्हणाले होते या विद्यापीठाला आता एका सीइओ कुलगुरूची गरज आहे. अगदी खरंय.
पी.एच्.डी विद्यार्थी कमी असले तरी चालेल पण आपल्या संस्थेच्या अंतर्बाह्य अब्रूचे धिंडवडे थांबवण्याइतकी कार्यनिष्ठा आणि क्षमता असलेल्या कुलगुरूंची गरज आहे.
आपल्या भोवती रुंजी घालणाऱ्या घनिष्ठांना किंवा पायपुसण्यांना प्राधान्याने कृपाप्रसाद वाटणारे कुलगुरू अलिकडच्या काळात भरपूर होऊन गेले. गुणवत्तेचा विचार करून स्तुतीप्रियतेची शिकार न होणारे कुलगुरू हवेत.
शिस्त आणण्यासाठी यंत्रे बसवण्यापलिकडे विचार न करू शकणारे प्रशासक भरपूर होऊन गेले. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विद्याकेंद्री कामासाठी स्वच्छ वातावरण आणि ऊर्मी देणारे कुलगुरू हवेत.
इतरांच्या कल्पनांना उचलून धरलं तर श्रेय द्यावं लागेल म्हणून कल्पनाच ठेचून टाकणारे पोषाखी कुलगुरू खूप पाहिले. इतरांना मोठं करत स्वतः मोठं होणारे कुलगुरू हवेत.
गेली काही वर्षे या विद्यापीठात काम करणारे कित्येक निष्ठावंत विद्वान आणि कर्मचारी आता वीट आला या विद्यापीठाचा म्हणतात. हे म्हणताना त्यांची मने भळभळत असतात. सोडून जाऊ म्हणतानाच या विद्यापीठासंबंधी अजूनही जिवंत असलेला लोकादर पाहून पुन्हा त्यांची पावले अडखळतात.
या दुःखाला कारण आहे सातत्याने मिळत गेलेले सुमार नेतृत्व. विद्यापीठाच्या तीन महत्त्वाच्या सभागृहांत चालणारे कोते राजकारण, प्रशासकीय रद्दीनिर्मितीचा अव्याहत उद्योग, पोट भरण्यासाठी विद्येचे पीठ करणाऱ्या शिक्षकांची, तथाकथित विद्वानांची मांदियाळी.
तरीही... ही परिस्थिती सुधारेल अशी आशा तर ठेवायलाच हवी.
ही परिस्थिती सुधारण्याची इच्छा असेल तर विद्यापीठावर, विद्यापीठात असणाऱ्यांवर सुजाण टीका होत रहायला हवी. कोणी कुठेही वृत्तपत्रांत बोलू नये, लिहू नये, आपली लक्तरे बाहेर टांगू नये अशी अपेक्षा या क्षेत्रात असताच कामा नये. विद्यापीठाची लक्तरे विद्यापीठीयांनीच दाखवायला हवीत. कारण विद्यापीठाला नवीन वस्त्रे हवी आहेत. कारण विद्यापीठाची वस्त्रे हीच या देशातील युवकांची वस्त्रे असणार आहेत.
आपली नियुक्ती झाली नाही म्हणून पारदर्शकतेची भाषा बोलणाऱ्यांवर, नियुक्ती झाल्यानंतर सहा-सात महिने सत्कार घेत, गहिवरली भाषणे करणाऱ्या सर्वांवर, विद्यार्थांवर अन्याय करणाऱ्या शिक्षकांवर, पैसे चारून मार्क्स वाढवून घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर, वाढीव मार्कांपासून ते मार्कशीट वेळेवर देण्यासाठी कसल्याही प्रकारच्या कामासाठी पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर, पैसे मागून ऍडमिशन देणाऱ्या प्राचार्यांवर, त्यांना तसे करण्यास उद्युक्त करणाऱ्या व्यवस्थापनांवर, पक्षीय राजकारणाचे मैदान म्हणून विद्यापीठाचे अंगण वापरणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर. विद्याक्षेत्रातील नियुक्त्यांसाठी दडपण आणून स्वतःचे निम्नदर्जाचे पित्त्ये भरू पहाणाऱ्या राजकारण्यांवर विद्यापीठीय स्वजनांनी, सज्जनांनी सातत्याने, निर्भयपणे आणि जोरकस आवाजात टीका करीत राहीले पाहिजे. तितकेच स्वतःचे काम निष्ठेने करीत राहिले पाहिजे.
नवनियुक्त कुलगुरू कसदार असतील तर ते सत्याच्या बाजूने उभे राहतील. नसतील तर मागच्या पानावरून पुढे कथा सुरू राहील. पण असा कस असेल तर त्यांच्या वयाचा, त्यांनी पी.एच्.डी किती काढले याचा, किंवा त्यांनी कुणाशी ओळखी वाढवल्या आणि नियुक्ती करून घेतली त्याचाही बाऊ करण्याचं कारण रहाणार नाही.
अशी समर्थ टीका करणाऱ्या सर्वांची निष्ठा विद्यापीठ प्रशासनाशी नव्हे तर विद्यापीठाशी असायला हवी.
त्याही पुढे जाऊन- निष्ठा विद्यापीठाशीच नव्हे तर विद्येशी असायला हवी !

Subscribe to:
Posts (Atom)